शरीर व मन निरोगी राहण्यासाठी योगासने आवश्यक, आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

भाजपचे नेते जालिंदर कामठे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला 

शरीर व मन निरोगी राहण्यासाठी योगासने आवश्यक, आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
पुणे:- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने करताना भाजपचे नेते जालिंदर कामठे व ग्रामस्थ आणि शिक्षक.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २१ जून २०२५ :-  शरीर व मन निरोगी राहण्यासाठी योगासने ही महत्त्वाची भूमिका निभावत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच नियमित योगासने करावीत, असा सल्ला भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शालेय विद्यार्थ्यांना दिला.

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या हिवरे (ता. पुरंदर) येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शब्बीर शेख, सुदर्शन कुदळे,नंदू गायकवाड, सोपान कामठे, मुख्याध्यापिका सुनीता रायडू, रोहिणी गायकवाड, चंद्रशेखर गुरव, दत्तात्रेय गायकवाड, विकास भोसले, संदीप चाचर, मेघा गायकवाड, स्वाती बोरकर, वैशाली पवार, स्मिता बोराटे आदी उपस्थित होते. यावेळी संजय शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिके घेण्यात आली.