बारावीत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर वसंतदादा पाटील प्रतिष्ठानची कौतुकाची थाप 

प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते खास गौरव : सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप  

बारावीत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर वसंतदादा पाटील प्रतिष्ठानची कौतुकाची थाप 
पुणे:- गुणवंत विद्यार्थ्यांबरोबर संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कामठे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
बारावीत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर वसंतदादा पाटील प्रतिष्ठानची कौतुकाची थाप 

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १९ मे २०२५ :- इयत्ता बारावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केलेल्या गुणवंतांचा वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १९ मे) खास गौरव करण्यात आला.यावेळी कोंढवा बुद्रुक येथील प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय व हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनिअर कॉलेजमधील गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा रोख रक्कम आणि शैक्षणिक साहित्य भेट देत, संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या समारंभात बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना      गुणपत्रिका वाटप करण्यात आल्या.यावेळी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष कामठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कायम नवनवी स्वप्ने पाहिली पाहिजेत, या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्ला कामठे यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना दिला. 

दरम्यान, कामठे यांनी यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या यशात शिक्षक, पालक व शाळेचे मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.प्रमोद बोत्रे, अॅड मधुकर धांडेकर, शिवाजी मरळ, सुखदेव लोणकर  शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्था,शाळा, शिक्षक व पालकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भानुदास रिठे यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी साबळे यांनी केले तर, पर्यवेक्षक हेमंत जाधव यांनी आभार मानले.