Research on Call Access Control Based on A.I. : पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याच्या पत्नीचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॉल प्रवेश नियंत्रणावर उल्लेखनीय संशोधन! 

संशोधनात मोबाइल नेटवर्कची कार्यक्षमता सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर : ज्योती पाटील यांना शिवपुरी विद्यापीठाची डॉक्टरेट जाहीर 

Research on Call Access Control Based on A.I. : पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याच्या पत्नीचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॉल प्रवेश नियंत्रणावर उल्लेखनीय संशोधन! 
पुणे:- डॉ. ज्योती पाटील, पुणे.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ११ सप्टेंबर २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका कनिष्ठ सहायकाच्या पत्नीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॉल प्रवेश नियंत्रणावर उल्लेखनीय संशोधन केले आहे.या संशोधनामुळे त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही विद्यापीठ स्तरावरील सर्वोच्च पदवी जाहीर केली आहे. या संशोधनामुळे कृत्रीम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून मोबाइल नेटवर्कची कार्यक्षमता सुधारण्यासाठी फायदा होणार आहे. ज्योती पाटील असे संशोधिकेचे नाव असून त्या पुणे जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक सुनील भापकर यांच्या पत्नी आहेत. 

या संशोधनात ज्योती पाटील यांनी मोबाइल नेटवर्कमधील कॉल प्रवेश नियंत्रण (Call Admission Control) अधिक कार्यक्षम करून नेटवर्कची कार्यक्षमता सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence - AI) वापर यावर भर दिला आहे. त्यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॉल प्रवेश नियंत्रणाचा वापर करून मोबाइल नेटवर्कची कार्यक्षमता सुधारणे’ (Improving Mobile Network Performances Using AI-Powered Call Admission Control) या विषयावर मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील पी. के. विद्यापीठातून (P. K. University) हे संशोधन पूर्ण केले आहे. 

यामध्ये मोबाइल नेटवर्कमधील उपलब्ध संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर, कॉल प्रवेश नियंत्रणाची कार्यक्षमता आणि एकूण नेटवर्कची कामगिरी सुधारण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर त्यांच्या संशोधनात भर देण्यात आला आहे.

तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मोबाइल नेटवर्क अधिक कार्यक्षम करण्याच्यादृष्टीने त्यांचे संशोधन उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. या यशाबद्दल कुटुंबीय, सहकारी, मित्रपरिवार आणि विद्यार्थ्यांकडून ज्योती पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.