Central education minister Dharmendra Pradhan Resignation : ... अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविला होता राजीनामा :  जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश

Central education minister Dharmendra Pradhan Resignation : ... अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर! 
पुणे:- धर्मेंद्र प्रधान.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि‌. २५ जुलै २०२५ :- ... अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी (दि.२५ जुलै) मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सायंकाळी प्रधान यांचा राजीनामा मंजूर केला आहे.दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या या राजीनाम्यामुळे गेल्या ३५ दिवसांपासून नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे अखेर यश आले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची गेल्या बारा वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. 

कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही,असा इशारा देत आंदोलन आणखी तीव्र करण्याची इशारा दिला होता. दिल्लीतील या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर या प्रमुख शहरासह देशातील राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी प्रमुख राज्यांमध्ये पोहोचले होते. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकाविरोधात असंतोष वाढत चालला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे.

देशात आणि नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये. देशाची एकता टिकून राहावी. एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअरवर केंद्रित करावा, या हेतूने मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवून दिल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. 

राजीनामा मंजुरीची घटनात्मक तरतुद काय? 

राज्य घटनेतील तरतुदीनुसार केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे किंवा थेट राष्ट्रपतींकडे पाठविता येतो. पंतप्रधानांकडे दिलेला राजीनामा हा पंतप्रधान हे मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवत असतात आणि राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्याने हा राजीनामा मंजूर करत असतात. त्यामुळे जोपर्यंत राष्ट्रपती मंत्र्यांचा राजीनामा मंजूर करत नाहीत, तोपर्यंत संबंधित मंत्री आपल्या पदावर कायम राहत असतो.