Dr. Ankit Shah's special lecture on deglobalization : तुम्हाला माहित आहे का?, डिग्लोबलायझेशन म्हणजे काय?, नाही ना, मग हे जाणून घ्यायचंय तर, तुमच्यासाठी खास हे व्याख्यान!

अभ्यासक डॉ. अंकित शहा येत्या रविवारी  'जागतिकीकरण अन् सनातन इकॉनॉमिक्स मॉडेल' या विषयावर व्याख्यान देणार

Dr. Ankit Shah's special lecture on deglobalization : तुम्हाला माहित आहे का?, डिग्लोबलायझेशन म्हणजे काय?, नाही ना, मग हे जाणून घ्यायचंय तर, तुमच्यासाठी खास हे व्याख्यान!
पुणे:- चाणक्य मंडळचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी आणि डॉ. अंकित शाह.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २५ ऑक्टोबर २०२५ :- जागतिक सत्तेतील बदल, त्याचे परिणाम व अलीकडील जिओ पॉलिटिक्समुळे वाढलेल्या आव्हानांमध्ये भारताने दाखवलेली स्थिरता याविषयावर समाज जागृती करण्यासाठी पुण्यात येत्या रविवारी (दि.२६ ऑक्टोबर) 'जागतिकीकरण अन् सनातन इकॉनॉमिक्स मॉडेल' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या विषयाचे अभ्यासक डॉ. अंकित शहा या विषयावर व्याख्यान देणार आहेत. 

पुण्यातील नेशन फर्स्ट (एन. एफ.) आणि चाणक्य मंडळाच्या वतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान येत्या रविवारी सायंकाळी ५.३० वाजता हडपसर येथील विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती नेशन फर्स्ट संस्थेच्या संयोजिका संयुक्ता भोसले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना  दिली. यावेळी डॉ.अंकित शाह 'डि-ग्लोबलायझेशन आणि सनातन इकॉनॉमिक्स मॉडेल' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

नेशन फर्स्ट या संस्थेच्यावतीने समाजात जागतिक सत्तेतील बदल, त्याचे परिणाम आणि अलीकडील जिओ पॉलिटिक्स आव्हानामध्ये भारताने दाखवलेली स्थिरता याबाबत जागरूकता निर्माण केली जाते. यानुसार या व्याख्यानात भारताची अर्थव्यवस्था ही सनातन आर्थिक मॉडेलच्या भक्कम पायावर आधारित असून ती सातत्याने कशी वाढत चालली आहे. युवक व नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी योग्य दिशा आणि दीर्घकालीन निर्णय घेण्याची क्षमता याविषयीची मार्गदर्शन केले जाणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सुनील भोसले, अमित कुलकर्णी, मनोज जपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

व्याख्याते डॉ. अंकित शाह कोण आहेत?

डॉ. अंकित शाह हे व्यवसायिकरित्या चार्टर्ड अकाउंटंट असून, ते परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा विषयातील तज्ज्ञ आहेत. अचूक जागतिक भाकितांमुळे त्यांना ओरॅकल ऑफ इंडिया (Oracle of India) म्हणून संबोधले जाते. ते विद्यार्थ्यी,  विचारवंत आणि धोरणकर्त्यांसाठी भारत केंद्रित व दूरदृष्टीपूर्ण विचार ते मांडत असतात. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर (पूर्वीचे Twitter) २०० हून अधिक केलेली भाकीते  खरी ठरली आहेत. यामध्ये प्रामुख्यान बालाकोट एअर स्ट्राईक, कलम ३७० आणि रशिया-युक्रेन संघर्ष आदींचा समावेश आहे. त्यांचे जिओ-पॉलिटिक्स या विषयावरील पुस्तक भारतीय दृष्टिकोनातून जागतिक सत्तेच्या हालचालींचे विश्लेषण करते. शिवाय सनातन इकॉनॉमिक्सवरील त्यांचे संशोधन ब्रिक्स (BRICS) शिखर परिषद, आयसीएआय (ICAI) आणि आयआयटी मद्राससारख्या संस्थांमध्ये ते चर्चेचा विषय ठरले आहेत.