Prof. Chadchankar Ph.D. :- प्रा. अमरनाथ चडचणकर यांना पीएच.डी. पदवी जाहीर!
पी. के. विद्यापीठातून एसक्यूएल (SQL) डेटाबेसच्या सुरक्षिततेसाठी मशीन लर्निंगवर आधारित घुसखोरी शोध प्रणालीवर संशोधन
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ११ सप्टेंबर २०२६ :- डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संगणक अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक म्हणून प्रा. अमरनाथ शिवानंद चडचणकर यांना एसक्यूएल (‘SQL ) डेटाबेससाठी मशीन लर्निंगचा वापर करून घुसखोरी शोध प्रणाली’ या विषयावरील उल्लेखनीय संशोधनासाठी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील पी. के. विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही सर्वोच्च पदवी जाहीर झाली आहे.
त्यांनी हे संशोधन पी. के. विद्यापीठाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पूर्ण केले. त्यांच्या संशोधनात एसक्यूएल (SQL) डेटाबेसवरील अनधिकृत प्रवेश तसेच संभाव्य सायबर हल्ले ओळखण्यासाठी मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून घुसखोरी शोध प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. या संशोधनासाठी त्यांना डॉ. बलवीर सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.
सुमारे ४ वर्षांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, परिश्रम आणि संशोधनातून त्यांनी हे यश संपादन केले. संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांना अध्यापन आणि औद्योगिक क्षेत्रातील मिळून सुमारे १८ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी संगणक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून त्यांचे संशोधन प्रसिद्ध झालेले असून विविध परिषदांमध्येही प्रकाशित झालेले आहे.
त्यांनी संशोधनासोबतच पेटंट आणि कॉपीराइट क्षेत्रातही योगदान दिले आहे. डेटा संरचना, डेटाबेस, सायबर सुरक्षा आणि मशीन लर्निंग हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. सध्या ते डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि उद्योगाभिमुख शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी आणि विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
