राज्यस्तरीय मंथन परीक्षेत येवलेवाडीतील हौसाई सेमी इंग्लिश प्रायमरी स्कूलची बाजी, शाळेचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडून शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन 

शाळेचे ५० विद्यार्थी ठरले मंथन परीक्षेत पात्र : इयत्ता चौथीचा १०० टक्के निकाल 

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत येवलेवाडीतील हौसाई सेमी इंग्लिश प्रायमरी स्कूलची बाजी, शाळेचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडून शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन 
येवलेवाडी (पुणे) :- राज्यस्तरीय मंथन परीक्षेत राज्यस्तरावर झळकलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करताना हौसाई शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक.

प्रा. मीरा बडे-सांगळे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २ एप्रिल २०२५ :-  येवलेवाडी (ता. हवेली) येथील स्वर्गीय बबनराव खंडूजी कामठे माध्यमिक विद्यालय आणि हौसाई सेमी इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मंथन परीक्षेत बाजी मारली आहे. या शाळेतील तब्बल ५० विद्यार्थी मंथन परीक्षेत राज्यस्तरावर झळकले आहेत. शाळेचा या परीक्षेचा इयत्ता चौथीच्या वर्गाचा निकाल १०० टक्के लागला आहे. 

दरम्यान, या यशाबद्दल  वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि  भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन  केले आहे. श्री. कामठे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

या राज्यस्तरीय मंथन परीक्षेसाठी या विद्यालयातील 58 विद्यार्थी बसले होते. यापैकी 50 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा शाळेचा इयत्ता पहिलीचा निकाल 80 टक्के, इयत्ता दुसरीचा व तिसरीचा निकाल प्रत्येकी 93 टक्के आणि इयत्ता चौथीचा निकाल 100 टक्के  लागला आहे.हौसाई सेमी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी विविध उपक्रम घेतले जातात.विद्यालयाच्या प्रगतीचा स्तर दिवसेंदिवस उंचवताना पाहायला मिळत आहे.

या संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कामठे, प्राचार्य संतोष आबनावे विजया महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मुख्याध्यापिका सारिका जगताप, स्वाती शेवते,विद्या घारे,मायेश्वरी भोसले, चंद्रकला पवार, माया नाईक, वनिता परकाळे, माधुरी देसले, वेदांती पवार या मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.