Pune zp teacher's day : पुणे जिल्हा परिषदेकडून १७ शाळा,५३ शिक्षक आणि ५२२ गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर 'कौतुकाची थाप'! 

शिक्षक दिनानिमित्त शिक्षणातील गुणवत्तापूर्ण कामाची पुणे झेडपीकडून दखल : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते खास गौरव

Pune zp teacher's day : पुणे जिल्हा परिषदेकडून १७ शाळा,५३ शिक्षक आणि ५२२ गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर 'कौतुकाची थाप'! 
पुणे :- पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे व अन्य पदाधिकारी व अधिकारी.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ६ सप्टेंबर २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेने शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील १७ झेडपी शाळा, ५३ शिक्षक व ५२२ गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. यासाठी शिक्षणातील गुणवत्तापूर्ण कामाची दखल घेत, या सर्वांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते खास गौरव करण्यात आला. 

या गौरव समारंभासाठी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने पुणे शहरातील स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे शिक्षक दिनानिमित्त एका भव्य-दिव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या दोन वर्षांचे शाळांना दिले जाणारे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पुरस्कार, शिक्षकांना दिले जाणारे जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या खास गौरव करण्यात आला. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, बापूसाहेब पठारे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे-पाटील, बांधकाम सभापती दीपाली हुलावळे, कृषी सभापती अमोल नलावडे, महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील-ठाकरे, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले-कावडे, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर आदी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांमध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा :  सुनेत्रा पवार यांचा शिक्षकांना कानमंत्र

शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र असून शिक्षक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न देता त्यांच्यामध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा, असा कानमंत्र उपमुख्यमंत्री  सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी बोलताना शिक्षकांना दिला. 

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाल्या, "पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी याच भूमीत शिक्षणाची ज्योत पेटवली. या समृद्ध शैक्षणिक परंपरेत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे खरे शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्याचे कार्य ते करतात. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले ही ग्रामीण महाराष्ट्राची खरी ताकद असून त्यांच्या गुणवत्ता आणि क्षमतेला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे. महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञांची भूमी आहे. राज्यातील अनेक शिक्षकांनी आपल्या कार्यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला आहे." 

शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत करा : अध्यक्ष वीरधवल जगदाळे

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी, ही जिल्हा परिषदेची भूमिका असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, " शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे. चांगल्या कामाचे नेहमीच मूल्यमापन केले जाईल. शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४३६ शिक्षक नव्याने रुजू होणार आहेत. शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा ताण कमी करण्याबाबतही राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, असा विश्वास आहे." 

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसोबतच सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील शाळांना संरक्षक भिंती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी यावेळी बोलताना केली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद शाळांच्या प्रगतीचा आढावा घेतला. राज्य गुणवत्ता यादीतील ५० टक्के विद्यार्थी पुणे जिल्हा परिषदेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या मिशन ३००, शिक्षक सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षण, ग्लोबल गुरुजी,  बालकुमार साहित्य संमेलन, मुलींसाठी सायकल बँक,बालसंसद आदी उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) ललिता दहितुले-कावडे  यांनी आभार मानले.

'जिल्हा परिषद अध्यक्ष चषक' च्या मानकरी शाळा (सन २०२५-२६) 

 १) इयत्ता १ ली ते ५ वी गट 

- जिल्हा परिषद शाळा गंगावळण ( ता. इंदापूर) व शिनोली (ता. आंबेगाव) --- विभागून प्रथम. 
 
- जिल्हा परिषद शाळा आमराळवाडी (ता. खेड)--- द्वितीय. 

- जिल्हा परिषद शाळा अष्टापूर (ता. हवेली) --- तृतीय. 

 २) इयत्ता पहिली ते आठवी गट 

- जिल्हा परिषद  शाळा पिंपळे खालसा (ता. शिरूर) --- प्रथम. 

- जिल्हा परिषद शाळा, घाटघर (ता. जुन्नर)---  द्वितीय. 

- जिल्हा परिषद शाळा काठापुर बुद्रुक (ता. आंबेगाव) व जिल्हा परिषद शाळा, पानशेत (ता. वेल्हे) --- विभागून तृतीय.

अध्यक्ष चषक सन २०२४-२५

१) इयत्ता पहिली ते पाचवी गट 

- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्वी ( ता. जुन्नर) --- प्रथम. 

- जिल्हा परिषद शाळा भांडगाव ( ता. दौंड) व पाचर्णेवाडी (ता. शिरूर) --- विभागून द्वितीय.

- जिल्हा परिषद शाळा गौराईमळा (ता.इंदापूर) व वाफगांव (ता. खेड) --- विभागून तृतीय.

२) इयत्ता १ ली ते ८ वी गट

- जिल्हा परिषद शाळा वसेवाडी (ता. शिरूर) --- प्रथम. 

- जिल्हा परिषद शाळा नाणेकरवाडी (ता. खेड) --- द्वितीय. 

- जिल्हा परिषद शाळा मांजरवाडी (ता. जुन्नर) व 
रुळे (ता. वेल्हे) --- तृतीय.

तालुकानिहाय जिल्हा शिक्षक व उत्तेजनार्थ पुरस्कार यादी (२०२४-२०२५) (कंसात शाळेचे नाव) 

१) आंबेगाव 

- विजय सोपानराव वळसे --- प्रथम (गाढवे गोरडेमळा). 

- संगिता बबन वळसे --- उत्तेजनार्थ (मोरडेवाडी).

२) बारामती

- वनिता सचिन जाधव --- प्रथम  (काटेवाडी).

- शांता संतोष बालगुडे --- उत्तेजनार्थ (सांगवी).

३) भोर

- गणेश अशोक बोरसे --- प्रथम ( म्हाळवाडी). 

- अश्विनी संजय पवार --- उत्तेजनार्थ (उत्रोली). 

४) दौंड

- धनश्री माणिक पासलकर --- प्रथम (खामगाव). 

-  रेखा राजू वाखारे --- उत्तेजनार्थ (वडगाव बांडे). 

५) हवेली

- कुरेशी सलाउद्दीन शेख --- प्रथम (लोणी). 

--- मीना अशोक म्हसे ---  उत्तेजनार्थ (जगतापवाडी). 

६) इंदापूर

- प्रेमिला संभाजी खाडे --- प्रथम (मंडलिकवस्ती). 

- शेख ताहेस बकस --- उत्तेजनार्थ (दत्तवाडी).

७) जुन्नर

-  वैभव वामनराव सदाकाळ --- प्रथम (येणेरे)‌. 

- मधुकर ज्ञानदेव गायकवाड --- उत्तेजनार्थ (उंब्रज नं.१).

८) खेड 

- शैला मुकुंद गावडे --- प्रथम (धानोरे)

- वर्षाराणी दत्तात्रेय खळेकर  --- उत्तेजनार्थ (दावडमळा)

९) मावळ

- पोपटराव रामचंद्र चौघुले --- प्रथम (धामणे). 

- अक्षता सचिन अंबुले (कान्हे). 

१०) मुळशी 
 
- रियाज नसीर शेख --- प्रथम (भुगाव). 

- सलीम हसन तांबोळी --- उत्तेजनार्थ (मुठा).

११) पुरंदर 

- मनोजकुमार भालचंद्र सटाले --- प्रथम (नारायणपूर). 

-  सचिन मनोहर बोरावके --- उत्तेजनार्थ (घिसरेवाडी). 

- मोहन गोविंद जगताप ---  उत्तेजनार्थ (चांबळी).

१२) शिरूर 

- गोरख भाऊसाहेब काळे -- प्रथम (वाबळेवाडी). 

-  संतोष पांडुरंग वेताळ --- उत्तेजनार्थ ( कोयाळी पु.). 

१३) वेल्हे 

- शबाना जावेद खान --- प्रथम (पानशेत). 

- शुभांगी दुर्योधन भोसले --- उत्तेजनार्थ ( निगडे बु.). 

गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्कार

- निर्मला दिलीप काळे --- कान्हे (ता. मावळ.

सन २०२५ - २०२६ चे तालुकानिहाय जिल्हा शिक्षक पुरस्कार 

१) आंबेगाव

- संदीप बबन शिंदे --- प्रथम (थोरांदळे). 

- दीपा दत्ता गोरडे ---  उत्तेजनार्थ (चांडोली बुद्रुक). 

२) बारामती

- विद्या तानाजी गावडे ---  प्रथम (शिरसुफळ). 

- अमोल नानासाहेब भोसले --- उत्तेजनार्थ (काऱ्हाटी). 

३) भोर

- दत्तात्रेय गोरखनाथ पांगारे --- प्रथम (आंळदे). 

- रत्नप्रभा संतोष करवंदे --- उत्तेजनार्थ (केंजळ). 

४) दौंड

- मेधा  मधुकर मेस्त्री ---  प्रथम (गरडेवाडी). 

- सुनिता भिमाजी दिवेकर ---  उत्तेजनार्थ (जानाईमळा). 

५) हवेली

- सुवर्णा पांडू पवार ---  प्रथम (आर्वी). 

- दीपक हुकुम गायकवाड --- उत्तेजनार्थ (माळवाडी). 

६) इंदापूर

- उषा जयसिंग भोईटे --- प्रथम (नरसिंहपूर). 

- पुष्पा अंकुश कांबळे --- उत्तेजनार्थ (काझड). 

७) जुन्नर

- मिलिंद सुरेश औटी --- प्रथम (गणेशनगर). 

- स्वाती दातीर भरूण ---  उत्तेजनार्थ (पिंपरी पेंढार).

८) खेड

- अनिता शरद परदेशी --- प्रथम (धानोरे). 

- मच्छिंद्र गोरखनाथ शेटे --- उत्तेजनार्थ (आंबेठाण). 

९) मावळ

- संगिता किशोर भोसले --- प्रथम (परंदवडी). 

- अजिनाथ साधु शिंदे ---  उत्तेजनार्थ (निगडे). 

१०) मुळशी

- शुभांगी दशरथ पिंगळे --- प्रथम (नांदे).

- शितल दशरथ जावळे ---  उत्तेजनार्थ (भुगाव नं. २).

११) पुरंदर

- शुभांगी भानुदास कुंभारकर — प्रथम (केतकावळे). 

- अश्विनी लक्ष्मण गायकवाड — उत्तेजनार्थ (चिव्हेवाडी). 

१२) शिरूर

- मनिषा विश्वास साकोरे ---  प्रथम (पऱ्हाडवाडी). 

- संभाजी मारुती अडागळे — उत्तेजनार्थ (कांडगेवस्ती). 

१३) वेल्हे

- विकास दत्तात्रेय गायकवाड --- प्रथम (वांगणीवाडी). 

- दिपाली मकरंद घोडके ---  उत्तेजनार्थ (सोंडेसरपाले). 

 केंद्रप्रमुख पुरस्कार २०२६

-  वनिता बाळकृष्ण हांडे ---  प्रथम, केंद्र नागवडी, ता. जुन्नर.

-  शोभा मानसिंग होळकर ---  द्वितीय, केंद्र मळद, ता. बारामती.