Mrs. India Empress of the Nation 2026 : फर्ग्युसन महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. वैशाली ठाकूर यांचा राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत दुहेरी सन्मान! 

राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय उपविजेता हा मानाचा किताब आणि 'ब्युटी विथ पर्पज' हा विशेष पुरस्कार पटकावला

Mrs. India Empress of the Nation 2026 : फर्ग्युसन महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. वैशाली ठाकूर यांचा राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत दुहेरी सन्मान! 
पुणे:- प्रा. डॉ. वैशाली ठाकूर.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि.७ ऑगस्ट २०२६ : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. वैशाली ठाकूर यांनी राष्ट्रीय स्तरावरील मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन २०२६ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय उपविजेता हा मानाचा किताब आणि 'ब्युटी विथ पर्पज' हा विशेष पुरस्कार पटकावला आहे. 

दिवा पेजंट्स (DIVA Pageants) या संस्थेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेची अंतिम फेरी दि. ३० जुलै ते दि. २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुणे येथे घेण्यात आली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय उपविजेता हा मानाचा किताब आणि 'ब्युटी विथ पर्पज' हा विशेष पुरस्कार पटकावला. त्यांनी प्लॅटिनम श्रेणीत (Platinum Category) सेकंड रनर अप (2nd Runner-Up) हा मानाचा किताब आणि 'ब्युटी विथ पर्पज' हा विशेष पुरस्कारही पटकावला. तसेच त्यांना मिसेस इंटेलिजन्ट (Mrs. Intelligent) हा उपकिताबही प्रदान करण्यात आला.

दिवा पेजंट्स (DIVA Pageants) संस्थेच्या संस्थापक अंजना मस्करेन्हास आणि कार्ल मस्करेन्हास यांच्या मार्गदर्शनाखाली ही राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि सामाजिक जाण यांना प्रोत्साहन देणारे हे देशातील एक प्रतिष्ठित व्यासपीठ मानले जाते.

या किताबाच्या मानकरी ठरलेल्या डॉ. वैशाली ठाकूर या निवृत्त शिक्षण अधिकारी  एल. टी. ठाकूर यांच्या कन्या आणि इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीज सर्व्हिसमधील (IOFS) उच्चपदस्थ अधिकारी अरुण ठाकूर  यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या अध्यापन, संशोधन आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्या मुळच्या धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत.