Swarkala award: पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनच्या शिवराज साने यांना ‘स्वर कला उत्कृष्टता पुरस्कार!
गोव्यातील समाजकल्याण संचलनालय आणि स्वर कला संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समारंभात गौरव
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ७ ऑक्टोबर २०२६ :- गोव्यातील स्वर कला संघ, गोवा समाज कल्याण संचालनालय आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार समारंभात पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन (ता. हवेली ) येथील शिवराज साने यांना ‘स्वर कला उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गोव्यातील आमदार गोविंद गावडे, आमदार पेमेंद्र शेट आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती पारकर यांच्या हस्ते साने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला, सामाजिक बांधिलकी व आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने गौरव करण्यात येतो.
या पुरस्कार वितरण समारंभाच्यावेळी आयोजक डॉ. बाळकृष्ण खरात, फिरोज शेख, पत्रकार राहुल खरात, संदीप रासकर,सरपंच राहुल चाबुकस्वार, रघुनाथ ढोक, फुले शाहू आंबेडकर एज्युकेशन ट्रस्टच्या राखी रासकर, सम्राट बहुत देशाच्या जनजागृती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेखा साने, पूजा कोटी, सुरेखा बेहरा, मिलिंद सरवदे उपस्थित होते.
