Pune zp  Avinash Shinde : पुणे जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक अविनाश शिंदे यांचे दुःखद निधन!

त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी दोन वाजता धनकवडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार 

Pune zp  Avinash Shinde : पुणे जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक अविनाश शिंदे यांचे दुःखद निधन!
पुणे :- अविनाश शिंदे.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक अविनाश शिंदे यांचे शुक्रवारी (दि. १८ सप्टेंबर) दुःखद निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने जिल्हा परिषद कर्मचारी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.१९ ) दुपारी दोन वाजता धनकवडी येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शिंदे हे सन १९९७ मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाले होते. 

पुणे जिल्हा परिषदेतील प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी विविध विभागात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांची नुकतीच कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती झाली होती.त्यांच्या पश्चात आई,पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.