SIR enumeration form : महाराष्ट्रातील मतदार गणना अर्ज भरण्यासाठी उरले शेवटचे चार दिवस! 

सर्वांनी मतदार गणना फॉर्म भरा, अन्यथा नवीन मतदार यादीतून नाव वगळले जाणार : आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन अर्ज भरणे बंधनकारक 

SIR enumeration form : महाराष्ट्रातील मतदार गणना अर्ज भरण्यासाठी उरले शेवटचे चार दिवस! 
पुणे:- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२६ :- महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या दुरूस्तीसाठी सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एस.आय.आर.) मोहिमेची मुदत येत्या दि. ८ ऑगस्टला संपुष्टात येत आहे.

या मोहिमेत प्रत्येक मतदाराने एन्यूमरेशन फॉर्म ( मतदार गणना अर्ज) भरणे बंधनकारक आहे. हा अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे चार दिवस उरले आहेत. हा फॉर्म न भरणाऱ्या मतदारांचे नवीन मतदार यादीतून नाव वगळले जाणार आहे. 

या पार्श्वभूमीवर पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन येत्या दि. ८ ऑगस्टपर्यंत मतदार गणना अर्ज भरावा,असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे. या मुदतीत मतदार गणना अर्ज न भरणाऱ्या मतदारांचे नाव नवीन मतदार यादीतून वगळले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने हा अर्ज भरणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी डूडी यांनी स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्रात दि. ३० जून २०२६ पासून मतदार गणना अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.  याआधी यासाठीची अंतिम मुदत ही दि. २९ जुलै २०२६ होती. परंतू, निवडणूक आयोगाने यासाठी दि. ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.