Excellent Officer Award :-  वखार महामंडळाच्या सहाय्यक व्यवस्थापक स्नेहल जाधव यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार 

महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते गौरव 

Excellent Officer Award :-  वखार महामंडळाच्या सहाय्यक व्यवस्थापक स्नेहल जाधव यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार 
पुणे:- सहाय्यक व्यवस्थापक (वखार महामंडळ) स्नेहल महेशचंद्र जाधव

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १५ ऑगस्ट २०२५ :- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील वित्त विभागाच्या सहाय्यक व्यवस्थापक स्नेहल महेशचंद्र जाधव यांना सन २०२४-२५ या वर्षाचा राज्य सरकारचा उत्कृष्ट कर्मचारी-अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते स्नेहल जाधव यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने लीफ सोसायटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे‌‌. हा पुरस्कार लीफ सोसायटीसाठी मोठी गौरवाची बाब ठरली आहे.

अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्राची पदवी प्राप्त केलेल्या स्नेहल जाधव या मुळच्या मराठवाड्यातील बीड येथील रहिवासी आहेत‌. त्यांनी अभियांत्रिकी शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर सुरुवातीला काही काळ अध्यापनाचे काम केले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांची वखार महामंडळाच्या सेवेत नियुक्ती झाली‌. पुर्वाश्रमीच्या स्नेहल गायकवाड यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील संगणक अभियंता महेशचंद्र जाधव यांच्याशी विवाह झाला. 

दरम्यान, राज्य वखार महामंडळाच्या वर्धापनदिनी आयोजित करण्यात आलेल्या खास समारंभात स्नेहल जाधव यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्काराने गौरविण्यात आले.