हौसाबाई सोपानराव कामठे व जनाबाई काशिनाथ ओव्हाळ जुनिअर कॉलेजचा बारावीचा १०० टक्के निकाल 

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव 

हौसाबाई सोपानराव कामठे व जनाबाई काशिनाथ ओव्हाळ जुनिअर कॉलेजचा बारावीचा १०० टक्के निकाल 
पुणे:- बारावीच्या यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांसयवेत संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कामठे व प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी.

प्रा. मीरा बडे-सांगळे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ५ मे २०२५ :-  हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथील हौसाबाई सोपानराव कामठे आणि येवलेवाडी येथील जनाबाई काशिनाथ ओव्हाळ जुनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या दोन्ही ज्युनिअर कॉलेजमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा वसंतदादा पाटील प्रतिष्ठान आणि भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कामठे यांनी या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

कोंढवा बुद्रुक येथील हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनिअर कॉलेजमधील कला,  वाणिज्य आणि व विज्ञान या तीनही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. हवेली तालुक्यातील येवलेवाडी येथील श्रीमती जनाबाई काशिनाथ ओव्हाळ ज्युनिअर कॉलेजमधील कला व वाणिज्य या दोन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत म्हणजेच १२ वीच्या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष जालींदर कामठे यांनी  मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.तुम्ही आता आयुष्याच्या नव्या दालनात प्रवेश करीत आहात.अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही निवडलेल्या मार्गावरही नक्की यशस्वी व्हाल आणि चांगले नागरिक म्हणून नाव कमवाल. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दांत कामठे यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. यावेळी दोन्ही ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही कामठे यांनी अभिनंदन केले

प्रतिभाताई पवार माध्यमिक व हौसाबाई सोपानराव कामठे उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या परीक्षेत शाखानिहाय गुणानुक्रमे पहिले तीन विद्यार्थी खालीलप्रमाणे. 

१) कला          

- ऋतुजा आनंद सरगर - 88.33 टक्के 

- सिद्धी राजेंद्र कामठे - 82.33 टक्के        

- शितल कानसिंह  राठोड - 74.67 टक्के 

२) वाणिज्य      

- विद्या लक्ष्मण गायकवाड -  88.33 टक्के       
      
- अविनाश अंकुश साळवी -  84.83 टक्के  

- प्राची बापू भोसले - 79.67 टक्के 

३) विज्ञान                

- चाचर तनिष्का विकास चाचर - 82.50 टक्के 

- गौरी पांडुरंग सुर्यवंशी -74.50 टक्के 

- प्रितेश संपत साळवे - 70.17 टक्के 

श्रीमती जनाबाई काशिनाथ ओव्हाळ जुनिअर कॉलेजमधील शाखानिहाय गुणानुक्रमे पहिले तीन विद्यार्थी खालीलप्रमाणे 

१) वाणिज्य

- तहेनूर अल्ताफ अन्सारी - 78.67 टक्के 

- पायल रवी राठोड - 67.17 टक्के 

- दिपाली शंकर कोकरे - 66 .50 टक्के 

२) कला 

- सुहानी खाशाबा देसाई - 66.83 टक्के 

- अमिनाबी सलीम शेख - 63.33 टक्के 

- अनम मेहेरीन ताहेरखा सिद्दीकी - 61.17 टक्के