Late Kalindi Madgulkar memorial award : श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा शाळेचे कलाशिक्षक गजानन हरिदास यांचा कालिंदी माडगूळकर स्मृती पुरस्काराने गौरव!

शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात पुरस्कार प्रदान: स्नेहसंमेलन अन् पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न 

Late Kalindi Madgulkar memorial award : श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा शाळेचे कलाशिक्षक गजानन हरिदास यांचा कालिंदी माडगूळकर स्मृती पुरस्काराने गौरव!
पुणे:- कलाशिक्षक गजानन हरिदास यांना कालिंदी माडगूळकर आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने सन्मानित करताना राजेंद्रकुमार मुथा व योगेश माडगूळकर आणि अन्य प्रमुख पाहुणे.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २३ डिसेंबर २०२५ :- श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील कलाशिक्षक गजानन हरिदास यांचा कालिंदी माडगूळकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या कालिंदी माडगूळकर आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा यांच्या हस्ते माडगूळकर कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विविध विजेत्यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली.

यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष शांतीलाल लुंकड, कोषाध्यक्ष प्रकाशचंद चोपडा, सहाय्यक सेक्रेटरी अनिलकुमार कांकरिया, विश्वस्त जयप्रकाश राका, नवीनचंद लुंकड, चंद्रकांत भन्साळी, प्रकाशचंद बंब, लेखक प्रा. डॉ. विलास आढाव, डॉ. सुधीर भालेराव, वरिष्ठ पत्रकार योगेश्वर माडगूळकर, जय धोका आदी उपस्थित होते.  

दरम्यान, याच समारंभात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सखुबाई चव्हाण, सिद्धी पांगरे, प्रतीक्षा कचरे व क्रीडा शिक्षक संदीप माशेरे यांना  सन्मानित  करण्यात आले. यावेळी महावीर वंदना, स्वागत नृत्य,संत गोरा कुंभार, राजस्थानी नृत्य,आई जगदंबे व देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कपिल राऊतमारे व अंजू शेंडगे यांनी प्रशालेतील विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विक्रम काळे यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी अलका बारगजे कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या पाटील, पल्लवी दुसाने, सुनिता शिंदे यांनी केले.पर्यवेक्षक रामनाथ खेडकर यांनी आभार मानले.