पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या १३ मे रोजी 'सैनिक दरबार'
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची उपस्थिती : माजी सैनिकांचे प्रश्न सोडविणार

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ९ मे २०२५ :- पुणे शहर व जिल्ह्यातील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येत्या मंगळवारी (दि. १३ मे) 'सैनिक दरबार' आयोजित करण्यात आला आहे.
या 'सैनिक दरबार' मध्ये जिल्हयातील आजी-माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी आदींना सहभागी होता येणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली हा सैनिक दरबार आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये आपापल्या समस्या व प्रश्न मांडण्यासाठी आजी-माजी सैनिक,माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जावर सैन्य क्रमांक, पद, नाव, पत्ता, मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
शिवाय हा अर्ज स्पष्ट विषयांसह तीन प्रतीमध्ये सादर करणे अनिवार्य असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (निवृत्त) यांनी म्हटले आहे.