सेवापुर्तीनिमित्त इंदू पवार यांचा जालिंदर कामठे यांच्या हस्ते खास सत्कार
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे पवार यांच्या निरोप समारंभाचे आयोजन

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २२ जून २०२५ :- कोंढवा बुद्रुक येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय आणि हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत असलेल्या कर्मचारी सौ. इंदू माणिक पवार यांचा भाजप नेते आणिवसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते सेवापुर्तीनिमित्त खास सत्कार करण्यात आला.
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्यावतीने कर्मचारी सौ.इंदू माणिक पवार यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे म्हणाले, " सौ. इंदू पवार यांनी त्यांच्या सेवेच्या कार्यकाळात अतिशय निष्ठेने, सचोटीने आणि मेहनतीने सेवा बजावत काम केले. त्यांचे पुढील आयुष्य निरोगी सुखी संपन्न जावो." यावेळी सौ. पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे, शाळा, मुख्याध्यापक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
या निरोप समारंभाला कामगार नेते बजरंग वाघ, शिवाजी मरळ, सुखदेव लोणकर,मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, सुनिता रायुडू, मुख्याध्यापक संतोष आबनावे आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भानुदास रिठे यांनी केले.सूत्रसंचालन शंकर बांगर यांनी पर्यवेक्षक हेमंत जाधव यांनी आभार मानले .