पिंपरीतील ए.एस.एम. महाविद्यालयांची यंदाच्या बारावीच्या निकालात उल्लेखनीय कामगिरी!

विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल : श्रेयश पटणीला माहिती तंत्रज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण 

पिंपरीतील ए.एस.एम. महाविद्यालयांची यंदाच्या बारावीच्या निकालात उल्लेखनीय कामगिरी!
पिंपरी:- श्रेयस पटणी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पिंपरी, दि. १२ मे २०२५ :-  पिंपरी येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या तीनही महाविद्यालयांनी यंदाच्या  बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. यामध्ये चिंचवड येथील गीतामाता महाविद्यालय,  सीएसआयटी पिंपरी आणि पूर्णानगर ज्युनियर कॉलेजने विज्ञान शाखेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेतील श्रेयश पटणी या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत माहिती व तंत्रज्ञान विषयामध्ये (आय.टी.) १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, विश्वस्त डॉ. प्रीती पाचपांडे, सेक्रेटरी डॉ. आशा पाचपांडे, डॉ. ललित कनोरे आणि तीनही प्राचार्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 

सीएसआयटी पिंपरी कॉलेजची सरस कामगिरी

पिंपरीमधील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या कॉमर्स सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्युनिअर कॉलेजने घवघवीत यश मिळविले आहे. या महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.१९ टक्के तर, एकूण निकाल ९१.३६ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून झेनब अन्सारी हिने ८६ टक्के गुण मिळवत प्रथम, वाणिज्य शाखेतून सौदागर रिहान याने ८०.३३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, सचिव डॉ. आशा पाचपांडे विश्वस्त डॉ. प्रीती पाचपांडे, सीएसआयटी प्राचार्य डॉ. ललित कनोरे आणि ज्युनियर कॉलेज प्राचार्या अर्चना वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

संस्थेच्या विज्ञान शाखेचा निकाल सलग१०० टक्के लागणे ही संस्थेच्या गुणवत्ता व मेहनतीचे फलित आहे. विज्ञान शाखेतील श्रेयश पटणी या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत माहिती व तंत्रज्ञान विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवले असल्याचे पूर्णानगर कॉलेजच्या प्राचार्या अपर्णा मोरे यांनी सांगितले. 

पूर्णानगर कॉलेजच्या विज्ञान शाखेतील इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आर्या झांबरे व विदुला पलांडे प्रत्येकी ८४.३३ टक्के, रितेश सावंत ८४.१७ टक्के आणि पार्थ वर्मा ८२.३३ टक्के यांचा समावेश आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ८६.९५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत शिवम दुबे ८३ टक्के, देवेंद्र गेहलोत ८२.६७ टक्के आणि शिबा खान ८०.५० टक्के यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत.

गीतामाता कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

गीतामाता इंग्लिश आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅंड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदा कॉलेजचा एकूण निकाल ९८.७२ टक्के इतका लागला आहे. औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, विश्वस्त डॉ. प्रीती पाचपांडे ,प्राचार्य कविता उपलंचिवार यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

शाखानिहाय निकाल

विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल

विज्ञान शाखेतील  गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.

तेजस प्रताप बोबडे --- ९३.५० टक्के.

रांगटे गौतमी मिलिंद रांगटे --- ९१.१७ टक्के.

सानिका प्रदीप नरखेडे --- ९०.६७ टक्के. 

वाणिज्य शाखेचा ९५.४५ टक्के निकाल 

वाणिज्य शाखेतील गुणवंत पुढीलप्रमाणे आहेत. 

चौधरी आफरीन अब्दुल वहाब चौधरी ---  ८१.६७ टक्के 

हितेश हिराराम चौधरी --- ७३.८३ टक्के  

 प्रीती राजू जाधव --- ७३.३३ टक्के 

कला शाखेचा ९० टक्के निकाल

कला शाखेतील गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत. 

चौधरी वीणा फुआराम चौधरी --- ८८.३३ टक्के 

नझरीन फातेमा अब्दुल मजीद खान --- ७४.५० टक्के 

प्रियांका बालू कोळी --- ६०.३३ टक्के