'ग्रामराज्य'ने महाराष्ट्रदिनी ओलांडला प्रतिदिन २५ हजार वाचकांचा टप्पा,सध्या २६ हजार नियमित वाचक!

दर्शकांची (व्हिवर्स) संख्या ४८ हजारांवर : वाचकांचा प्रतिसाद हेच यश, मनःपूर्वक आभार 

'ग्रामराज्य'ने महाराष्ट्रदिनी ओलांडला प्रतिदिन २५ हजार वाचकांचा टप्पा,सध्या २६ हजार नियमित वाचक!
पुणे:- पंचायतराज विषयावरील मराठी बातम्यांचे एकमेव न्यूज पोर्टल 'ग्रामराज्य'.

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३ मे २०२५ :-  देशातील पंचायतराज या विषयाला वाहिलेले मराठी भाषेतील एकमेव आणि ग्रामीण भागाच्या विकासाशी निगडित असलेल्या 'ग्रामराज्य' या मराठी न्यूज पोर्टलला अवघ्या ५० दिवसांत प्रतिदिन२६ हजार वाचक मिळाले आहेत.ऐन महाराष्ट्रदिनीच ग्रामराज्य पोर्टलने प्रतिदिन २५ हजार वाचकांचा टप्पा ओलांडला आणि त्यानंतरच्या एकाच दिवसात त्यात आणखी एक हजार वाचकांची भर पडली आहे.दरम्यान, या संकेतस्थळाला दररोज भेट देणाऱ्यांची म्हणजेच दर्शकांची (व्हिवर्स) संख्या आता ४८ हजार झाली आहे.वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे ग्रामराज्य न्यूज पोर्टलने आपली यशस्वी घौडदौड सुरू केली आहे. उत्तम प्रतिसादाबद्दल वाचकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानत आहोत. 

पंचायतराज हा विषय शहरी भागातील नागरिकांना आवडेल की नाही.शहरी नागरिकांना हा विषय आवडला नाही तर, या संकेतस्थळाचे पुढे काय होणार?, याला ग्रामीण भागातील वाचक मिळेल का?यासह अनेक प्रश्न मनात निर्माण होऊनही, कोणत्याही परिस्थितीत पंचायतराज या विषयावरील 'ग्रामराज्य' हे मराठी भाषेतील बातम्यांचे अनोखे संकेतस्थळ सुरू करायचेचं, असा निश्चय केला आणि यानुसार ०८ मार्च २०२५ रोजी म्हणजेच सुमारे ५० दिवसांपूर्वीच हे न्यूज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. वाचक व दर्शकांच्या (व्हिवर्स) उदंड प्रतिसादामुळे आणखी ऊंच भरारी घेण्याचे बळ 'ग्रामराज्य'ला मिळाले आहे. 

महाराष्ट्रातील वाचकांनी एवढ्या अल्प कालावधीत 'ग्रामराज्य'वर दाखवलेल्या या प्रेमाबद्दल आम्ही सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार मानत आहोत. यापुढेही आपण आम्हाला अशीच साथ द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहोत. वाचक या नात्याने आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, याच आम्हाला भविष्यात आणखी ऊंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहनात्मक ठरणार आहेत.आपले हे प्रोत्साहन आणि प्रेरणा कायम आमच्या पाठीशी राहील, अशी आशा आहे.

या वर्षीच्या जागतिक महिला दिनी (दि. ८ मार्च ) ग्रामराज्य हे मराठी बातम्यांचे औपचारिकपणे सुरू झाले.पण प्रत्यक्षात या संकेतस्थळावर बातम्या अपलोड करण्यास १२ मार्चपासून सुरूवात झाली आहे. तेव्हापासून महाराष्ट्रदिनापर्यंतच्या ५० दिवसांच्या कालावधीत २६ हजार नियमित वाचक  झाले आहेत. पुन्हा एकदा सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार आणि यापुढेही अशीच साथ द्याल, ही अपेक्षा आम्ही आमच्याकडून व्यक्त करत आहोत.

(टीप :-  पंचायतराज विषयावरील बातम्या व लेख वाचण्यासाठी www.gramrajya.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी, ही विनंती.)