अतिवृष्टीमुळे पुरंदर तालुक्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना मागणीचे निवेदन
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १ ऑक्टोबर २०२५ :- अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी शेतीचे बांधही फुटले आहेत. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे बुधवारी (ता.१ ऑक्टोबर) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जालिंदर कामठे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार रजपूत यांना या मागणीचे निवेदन दिले. पीक व शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी आणि शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यास सहकार्य करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तहसीलदार रजपूत यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जालिंदर कामठे यांनी सांगितले.
यावेळी उत्तम धुमाळ, अमित झेंडे,विराज काकडे, गणेश जगताप,वंदना जगताप, ईश्वर बागमार, उमेश जगताप, रमेश सस्ते, अजिंक्य कड, संदेश पवार, शिवाजी साळुंके, प्रमोद जगताप, निता सुभागडे, प्रीती जगताप, महेश जगताप, शांताराम कापरे, परवीन पानसरे, नवनाथ बोरावके, प्रकाश कदम, नंदन काकडे, सुनील सोनवणे, दत्तात्रेय बडदे, दत्ता राऊत,
हेमंत टिळेकर आदी उपस्थित होते.
