कोंढव्या'ची माहेरवाशीण डोणज्याच्या सरपंचपदी विराजमान

कोंढवा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने माहेरवाशीण स्नेहल वाल्हेकर यांचा जालिंदर कामठे यांच्या हस्ते खास सत्कार 

कोंढव्या'ची माहेरवाशीण डोणज्याच्या सरपंचपदी विराजमान
पुणे:- डोणजेच्या (ता. हवेली) सरपंचपदी बिनविरोध विराजमान झालेल्या कोंढव्यातील माहेरवाशीण सौ. स्नेहल वाल्हेकर यांचा खास सत्कार करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे व कोंढवा ग्रामस्थ.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ११ डिसेंबर २०२५ :-  कोंढवा बुद्रुक (ता. हवेली) येथील माहेरवाशीण सौ.स्नेहल योगेश वाल्हेकर (पुर्वीच्या कामठे) यांची डोणजे गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच वाल्हेकर या कोंढवा येथील ज्ञानेश्वर (माऊली) किसनराव कामठे यांची कन्या आहेत. या निवडीबद्दल कोंढवा ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते सौ.स्नेहल वाल्हेकर (कामठे) यांचा खास सत्कार करण्यात आला. 

डोणजे हे गाव आदर्श  करण्याकरिता पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण आणि रोजगार निर्मिती या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अधिक गतीने काम करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून डोणजे गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल, असे आश्वासन जालिंदर कामठे यांनी यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ. स्नेहल वाल्हेकर यांना दिले.

या सत्कार समारंभाला माजी आमदार महादेव बाबर, मधुकर मरळ, गणेश कामठे, संदीप बधे, शामराव मरळ, चंद्रकांत गायकवाड, माऊली कामठे, शिवाजी बधे, सचिन निंबाळकर, गणेश कड, कैलास थोरात, राजेंद्र कामठे, रघुनाथ मरळ, रामदास कामठे, स्वप्नील कामठे, राकेश कामठे, राजेंद्र भोसले, शिवाजी बधे, हनीफ पठाण, लहू येवले, सुरेखा मरळ, दिक्षा निंबाळकर, प्रीती बधे, अनुराधा बधे, सुरेखा कामठे आदी उपस्थित होते.