Pune zp election 2026 : पुणे 'झेडपी'त राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा 'दादा', राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार! 

'ग्रामराज्य एक्झिट पोल'चा अंदाज : राष्ट्रवादी काँग्रेसला ३९ तर, भाजपला १७ जागा मिळण्याची शक्यता

Pune zp election 2026 : पुणे 'झेडपी'त राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा 'दादा', राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार! 
पुणे:- पुणे झेडपी निवडणूक ग्रामराज्य न्यूज पोर्टल एक्झिट पोल

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ७ फेब्रुवारी २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं 'दादा' होईल आणि जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता स्थापन होईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचणीतून (एक्झिट पोल) दिसून येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ पैकी सर्वाधिक ३९ जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला (एनसीपी) मिळतील, असे ग्रामराज्य न्यूज पोर्टलने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत दिसून आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ १७ जागा जिंकत भाजप दुसऱ्या स्थानावर तर, शिवसेना १२ जागा पटकावत तिसऱ्या स्थानी राहील, असे या पाहणीत दिसून आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. येत्या सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी) रोजी मतमोजणी केली जाणार आहे. सन २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेत सदस्यांच्या एकूण ७५ जागा होत्या. परंतू, पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ३४ गावे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने, यंदाच्या निवडणुकीत झेडपी  सदस्यांची संख्या दोनने कमी झाली आहे. 

बहुमतासाठी ३७ जागा आवश्यक 

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी साधे  बहुमत असणे आवश्यक आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी ३७ सदस्यांचे साधे बहुमत आहे. यानुसार सत्ता स्थापनेसाठी किमान ३७ सदस्यांचा पाठिंबा असणे अनिवार्य आहे. हा आकडा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल, असेही या मतदानोत्तर चाचणीतून स्पष्ट झाले आहे. 

असे असेल २०२६ चे संभाव्य पक्षीय बलाबल 

- राष्ट्रवादी काँग्रेस --- ३९

- भाजप --- १७

- शिवसेना --- १२

- शिवसेना (उबाठा) --- ०२

- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार --- ०१

- कॉंग्रेस ---०१

- अपक्ष ---०१

झेडपीचे तालुकानिहाय संभाव्य पक्षीय बलाबल 

१) जुन्नर एकूण जागा ०८. यापैकी शिवसेना ४, राष्ट्रवादी काँग्रेस ४

२) आंबेगाव एकूण  जागा ०५. यापैकी शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १ , राष्ट्रवादी काँग्रेस २.

३) शिरूर एकूण  जागा ०७. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस ३, भाजप ४.

४) खेड एकूण जागा ०८. यापैकी शिवसेना १, शिवसेना (उबाठा) २, भाजप १, राष्ट्रवादी काँग्रेस ४

५) मावळ एकूण जागा ०५. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस ३, भाजप २

६) मुळशी एकूण जागा ०३. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस १, शिवसेना १, भाजप १.

७) हवेली एकूण जागा ०६. यापैकी भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस२, शिवसेना ०१. 

८) दौंड एकूण जागा ०७. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस ४, भाजप ३.

९) पुरंदर एकूण जागा ०४. यापैकी भाजप १, राष्ट्रवादी काँग्रेस १, शिवसेना १, कॉंग्रेस १.

१०) वेल्हे एकूण जागा ०२. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस १, शिवसेना १.

११) भोर एकूण जागा ०४. यापैकी शिवसेना १, भाजप १, राष्ट्रवादी काँग्रेस १, अपक्ष १.

१२) बारामती एकूण जागा ०६. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस ६. 

१३)  इंदापूर एकूण जागा ०८. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस ७, भाजप १.

झेडपीच्या निवडणूक रिंगणात असलेले पक्षनिहाय उमेदवार

- राष्ट्रवादी कॉंग्रेस --- ७२
- भाजप --- ५८
- शिवसेना --- ३८ 
- शिवसेना (उबाठा) --- २६
- कॉंग्रेस --- १४
- राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) --- ०६
- मनसे --- ०३ 
- अन्य व अपक्ष --- ८१ 
- एकूण --- २९९.