Reservation of Pune Zilla Parishad constituency declared : पुणे जिल्हा परिषदेचे ७३ पैकी २२ गट खुले!
झेडपी गटांचे आरक्षण जाहीर, ओबीसीसाठी १९ गट राखीव : अनुसुचित जाती प्रवर्गासाठीच्या एका गटात ऐनवेळी बदल, सर्व प्रवर्गातील महिलांसाठी मिळून एकूण ३७ जागा आरक्षित
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १३ ऑक्टोबर २०२५ :- ... अखेर पावणेचार वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानतर सोमवारी (दि.१३ ऑक्टोबर) पुणे जिल्हा परिषदेचे गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यासाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत एकूण ७३ पैकी २२ गट खुले झाले आहेत. अनुसूचित जातीसाठी (एस.सी.) ०७, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (एस.टी.) ०५, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) १९ गट राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय खुल्या गटातील महिलांसाठी २० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सर्व प्रवर्गातील मिळून एकूण ३७ गट हे महिलांसाठी राखीव झाले आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद कायद्यातील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अनुसुचित जाती आणि जमातीसाठी निश्चित केलेल्या एका गटात बदल करण्यात आला आहे. याआधी अनुसूचित जाती प्रवर्गातील सात गटांमध्ये समाविष्ट झालेला इंदापूर तालुक्यातील भिगवण गट हा आरक्षण सोडतीच्या वेळी अनुसुचित जाती प्रवर्गातून वगळण्यात आला आहे. त्याऐवजी आता हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या गटाचा अनुसूचित जाती प्रवर्गातील गटात समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्येचा उतरता क्रम चुकला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा बदल मंजूर केला आहे. याबाबत इंदापूर तालुक्यातील काही तरुण कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत सोमवारी पुणे जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत काढण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या समन्वयक आणि उपजिल्हाधिकारी डॉ. चारूशीला मोहिते -देशमुख, पुणे जिल्हा निवडणूक शाखेचे तहसीलदार राहूल सारंग, कुळ कायदा शाखेचे तहसीलदार जगदीश निंबाळकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी कायद्यातील तरतुदीनुसार अनुसुचित जाती (एस.सी.) आणि अनुसूचित जमाती (एस.टी.) या दोन प्रवर्गासाठी राखीव असलेले गट हे लोकसंख्येच्या निकषाच्या आधारे आधीच निश्चित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. यानुसार या दोन्ही प्रवर्गातील आरक्षणासाठी त्या त्या प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या विचारात घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
पुणे जिल्हा परिषदेचे एकूण ७३ गट आहेत. झेडपीच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल हा दि. २० मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत सुमारे पावणेचार वर्षांपासून या संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. एवढ्या प्रदीर्घ कालखंडानतर आज (सोमवारी) हे आरक्षण काढण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीसाठी हवेली तालुक्यातील गाऊडदरा जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिंनींच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या.यामध्ये श्रुतिका श्रीरंग सुर्वे,विभावरी विशाल ओव्हाळ,
श्रीज्ञा दादा सुर्वे, वेदांत महेश सुर्वे, कार्तिक राहुल दामगुडे शंभू दत्तात्रेय शिंदे आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता.यावेळी या शाळेचे शिक्षक रमेश गणेश पुरोहित हे उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेच्या गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षण (कंसात संबंधित गटातील दुसऱ्या गणाचे नाव)
- अनुसुचित जाती (एस.सी.) - एकूण जागा ०७ पैकी ०४ महिला.
१) अनुसूचित जाती (सर्वसाधारण) -एकूण जागा ०३.
१) नीरावागज (डोर्लेवाडी), ता. बारामती.
२) गोपाळवाडी (कानगाव), ता . दौंड.
३) उरूळीकांचन (सोरतापवाडी), ता. हवेली.
२) अनुसुचित जाती (महिला) - एकूण जागा ०४.
१) लासुर्णे (सणसर), ता. इंदापूर.
२) वालचंदनगर (बोरी), ता. इंदापूर.
३) गुणवडी (शिर्सूफळ), ता. बारामती.
४) लोणी काळभोर (कदमवाकवस्ती), ता. हवेली.
अनुसुचित जमाती (एस. टी.) - एकूण जागा ०५ पैकी ०३ महिला.
३) अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) - एकूण जागा ०२.
१) वाडा (वाशेरे), ता. खेड.
२) टाकवे बुद्रूक (नाणे), ता. मावळ.
४) अनुसुचित जमाती (महिला) - एकूण जागा ०३.
१) शिनोली (बोरघर), ता. आंबेगाव.
२) बारव (तांबे), ता. जुन्नर.
३) डिंगोरे (उदापूर), ता. जुन्नर.
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - एकूण जागा १९ पैकी १० महिला.
५) ओबीसी (सर्वसाधारण) एकूण जागा -०९.
१) पेरणे (लोणीकंद), ता. हवेली.
२) पौड (अंबडवेट), मुळशी.
३) वेल्हे बुद्रुक (वांगणी), ता. वेल्हे.
४) मेदनकरवाडी (काळूस), ता. खेड.
५) पिरंगुट (भुगाव), ता. मुळशी.
६) मांडवगण फराटा (वडगाव रासाई), ता. शिरूर.
७) यवत (बोरीभडक), ता. दौंड.
८)अवसरी बुद्रुक (पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे), ता. आंबेगाव.
९) वेळू (नसरापूर), ता. भोर.
६) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - एकूण जागा १०.
१) कडूस (चास), ता. खेड.
२) सुपा (काऱ्हाटी), ता. बारामती.
३) थेऊर (आव्हाळवाडी), ता. हवेली.
४) न्हावरा (शिरूर ग्रामीण), ता. शिरूर.
५) राजुरी (बेल्हे), ता. जुन्नर.
६) नारायणगाव (वारुळवाडी), ता. जुन्नर.
७) ओतूर (धालेवाडी तर्फे हवेली), ता. जुन्नर.
८) नीरा शिवतक्रार (कोळविहिरे), ता. पुरंदर.
९) बोरी बुद्रुक (खोडद), ता. जुन्नर.
१०) पळसदेव (बिजवडी), ता. इंदापूर.
- खुला गट (सर्वसाधारण) - एकूण जागा ४२ पैकी २० महिला.
७) खुला गट (सर्वसाधारण) - एकूण जागा २२.
१) आळे (पिंपळवंडी), ता. जुन्नर.
२) सावरगाव (कुसूर), ता. जुन्नर.
३)पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (जारकरवाडी), ता. आंबेगाव.
४) कवठे यमाई (टाकळीहाजी), ता. शिरूर.
५) पाबळ (केंदूर), ता. शिरूर.
६)पिंपळगाव तर्फे खेड (मरकळ), ता. खेड.
७)नाणेकरवाडी (म्हाळुंगे), ता. खेड.
८) कुसगांव बुद्रुक (काले), ता. मावळ.
९) हिंजवडी (माण), ता. मुळशी.
१०) राहू (खामगांव), ता. दौंड.
११) खडकी (देऊळगावराजे), ता. दौंड.
१२)बोरीपार्धी (केडगाव स्टेशन, ता. दौंड.
१३) बेलसर (माळशिरस), ता. पुरंदर.
१४) वीर (भिवडी), ता. पुरंदर.
१५) विंझर (पानशेत), ता. वेल्हे.
१६) भोंगवली (कामथडी), ता. भोर.
१७) भोलावडे (शिंद), ता. भोर.
१८) उत्रोली (कारी), ता. भोर
१९) पणदरे ( मुढाळे), ता. बारामती.
२०) निंबूत ( कांबळेश्वर), ता. बारामती.
२१) वडापुरी (माळवाडी), ता. इंदापूर.
२२) काटी (लाखेवाडी), ता. इंदापूर.
८) खुला गट (महिला)-एकूण जागा २०.
१) रेटवडी (वाफगांव), ता. खेड.
२) पाटस (कुरकुंभ), ता. दौंड.
३) वडगाव निंबाळकर (मोरगाव), ता. बारामती.
४) तळेगाव ढमढेरे (रांजणगाव सांडस), ता. शिरूर.
५) निमगाव केतकी (शेळगाव), ता. इंदापूर.
६) खडकाळे (कार्ला), ता. मावळ.
७) कळंब (चांडोली बुद्रुक), ता. आंबेगाव.
८) वरवंड (पारगाव), ता. दौंड.
९) शिक्रापूर (सणसवाडी), ता. शिरूर.
१०) घोडेगाव (पेठ), ता. आंबेगाव.
११) इंदुरी (वराळे), ता. मावळ.
१२) खेड शिवापूर (खानापूर), ता. हवेली.
१३) पाईट (आंबेठाण), ता. खेड.
१४) भिगवण (शेटफळगढे), ता. इंदापूर.
१५) रांजणगाव गणपती (कारेगाव), ता. शिरूर.
१६) कुरुळी (आळंदी ग्रामीण), ता. खेड.
१७) सोमाटणे (चांदखेड), ता. मावळ.
१८) बावडा (लुमेवाडी), ता. इंदापूर.
१९) गराडे (दिवे), ता. पुरंदर.
२०) कोरेगाव मूळ (केसनंद), ता. हवेली.
