वृक्षारोपनातून गराडेत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण : भाजपतर्फे आयोजन

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ५ जून २०२५ :- पुणे जिल्ह्यातील गराडे (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (दि. ५ जून) वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी पुरंदर (पश्चिम)च्यावतीने या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे उपस्थित होते. यावेळी बोलताना कामठे यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि प्रत्येकाने वर्षातून किमान एक झाड लावण्याचे आवाहन केले. यावेळी एक वृक्ष, एक जीवन, वृक्ष वल्ली आम्हा सगेसोयरे या घोषवाक्याखाली पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, भाजपा पुरंदर तालुका (पश्चिम) अध्यक्ष संदीप कटके, युवा मोर्चा अध्यक्ष दिलीप कटके, सूरज औचरे, किरण कटके, जेष्ठ नेते मारुती कटके, गराडेचे सरपंच नवनाथ गायकवाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष योगेश जगदाळे, माजी उपसरपंच सुनिल जगदाळे, दत्तात्रेय जगदाळे, चंद्रकांत जगदाळे, लहु जगदाळे, संजय महाराज जगदाळे, भाऊसाहेब रावडे, बबन जगदाळे,अविनाश जगदाळे, संतोष जगदाळे, प्रफुल्ल जगदाळे, नितीन जगदाळे, दीपक जगदाळे, चेतन जगदाळे,लक्ष्मण जगदाळे, मयुर जगदाळे, दादा पवार, श्रीरंग रावडे आदी उपस्थित होते.