पीएमआरडीए'च्या सहआयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गातील कार्यतत्पर महसूल अधिकारी स्नेहल बर्गे यांचे दुःखद निधन 

महसूल विभागातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी काळाच्या पडद्याआड : जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त 

पीएमआरडीए'च्या सहआयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गातील कार्यतत्पर महसूल अधिकारी स्नेहल बर्गे यांचे दुःखद निधन 
पीएमआरडीए सहआयुक्त स्नेहल बर्गे

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २४ मार्च २०२५ :-  राज्याच्या महसूल विभागात अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गातील कार्यतत्पर अधिकारी आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सहआयुक्त स्नेहल बर्गे यांचे सोमवारी (दि.२४) दुःखद निधन झाले. त्या ४८ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे आई व एक बहिण असा परिवार आहे.  भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी पल्लवी बर्गे या त्यांच्या बहिण होत.

त्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या  जमीन व मालमत्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होत्या. वयाच्या २२ व्या वर्षी सन १९९९ मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी संवर्गात निवड झाली होती. या निवडीनंतर त्यांची पहिली नियुक्ती पुणे झाली होती.

त्यांनी याआधी पुणे येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, वाळवा व हवेली येथे उपविभागीय महसूल अधिकारी (प्रांताधिकारी), महसुल विभागाच्या उपजिल्हाधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी आदी विविध पदांवर त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. नुकतीच त्यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नत्ती झाली होती. या पदोन्नतीनंतर त्यांची पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सह आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.