Appointing Reporters for GramRajya News portal :- अल्पावधीतच वाचकसंख्येत गरुडझेप घेणाऱ्या 'ग्रामराज्य'साठी राज्यभर बातमीदार नेमणे आहेत.!

आपापला जिल्हा व तालुक्यातच काम  : सकारात्मक व विकासात्मक बातम्या आणि लेख लिहिण्याची मोठी संधी  

Appointing Reporters for GramRajya News portal :- अल्पावधीतच वाचकसंख्येत गरुडझेप घेणाऱ्या 'ग्रामराज्य'साठी राज्यभर बातमीदार नेमणे आहेत.!
पुणे:- न्यूजरुमचे ए. आय. ने तयार केलेले छायाचित्र.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १४ जून २०२५ :- आपल्याला लिखाणाची आवड आहे. पण योग्य प्रसारमाध्यमात लिहिण्याची संधी मिळत नाही, अशा गरजू युवकांना बातम्या व लेख लिहिण्यासाठी आणि नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेण्यासाठी आता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी आपल्याला फक्त आपापला जिल्हा व तालुक्यातील राजकीय सामाजिक, शैक्षणिक व अन्य महत्त्वपूर्ण विषयांची अचूक माहिती असायला हवी.

याशिवाय आपल्याला सकारात्मक व विकासात्मक पत्रकारिता करण्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने अल्पावधीतच वाचकसंख्येत गरुडझेप घेणाऱ्या 'ग्रामराज्य' न्यूज पोर्टलसाठी राज्यभर बातमीदार नेमावयाचे आहेत. यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा व तालुका पातळीवर बातमीदारांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. 

पुणे येथून अवघ्या तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या 'ग्रामराज्य' (Gram Rajya) हे मराठी न्यूज पोर्टल सुरू झाले आहे. एवढ्या अल्प कालावधीतच महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध वाचकांचा 'ग्रामराज्य'ला उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. वाचकांच्या या उदंड प्रतिसादामुळे ग्रामराज्य न्यूज पोर्टलने केवळ तीन महिन्यात मोठी गरूडझेप घेतली आहे. यामुळे 'ग्रामराज्य'च्या दरमहा वाचकांची संख्या आता ११ लाखांवर पोहोचली आहे. शिवाय दर्शकांच्या (व्हिवर्स) दरमहा संख्येने २१ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील पंचायतराज या विषयावरील एकमेव आणि ग्रामीण भागाच्या विकासाशी निगडित विषयावरील 'ग्रामराज्य' हे महाराष्ट्रातील एकमेव असे मराठी न्यूज पोर्टल आहे‌. 

महाराष्ट्रासह देश-विदेशातील वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे ग्रामराज्य मराठी न्यूज पोर्टलने आपली यशस्वी घौडदौड सुरू केली आहे. पंचायतराज हा विषय शहरी भागातील नागरिकांना आवडेल की नाही.शहरी नागरिकांना हा विषय आवडला नाही तर, या संकेतस्थळाचे पुढे काय होणार?, याला ग्रामीण भागातील वाचक मिळेल का? यासह अनेक प्रश्न मनात निर्माण होऊनही, कोणत्याही परिस्थितीत पंचायतराज या विषयावरील 'ग्रामराज्य' हे मराठी भाषेतील बातम्यांचे अनोखे संकेतस्थळ सुरू करायचेचं, असा निश्चय आम्ही हे न्यूज पोर्टल सुरू करताना केला होता. यानुसार ०८ मार्च २०२५ रोजी हे न्यूज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. 

इच्छुकांनी आपापले अर्ज व्यक्तीगत माहितीसह (बायोडाटा) खालील ई-मेलवर पाठवावेत. 
web.gramrajya@gmail.com

(टीप:- अधिक माहितीसाठी डॉ. गजेंद्र बडे यांच्याशी ९८८११४३६३१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा).