GramRajya's readership reaches 1.1 million per month :- अवघ्या तीन महिन्यात ग्रामराज्य न्यूज पोर्टलची गरुडझेप, वाचकसंख्या दरमहा ११ लाखांवर पोहोचली!

महाराष्ट्रातील वाचकांचा उदंड प्रतिसाद : दर्शकांची (व्हिवर्स) संख्या २१ लाखांवर

GramRajya's readership reaches 1.1 million per month :- अवघ्या तीन महिन्यात ग्रामराज्य न्यूज पोर्टलची गरुडझेप, वाचकसंख्या दरमहा ११ लाखांवर पोहोचली!
पुणे:- ग्रामराज्य न्यूज पोर्टलवरील बातम्या वाचत असल्याबाबतचे ए. आय. ने तयार केलेले हे छायाचित्र.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १३ जून २०२५ :-  अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पुणे येथून सुरू झालेल्या 'ग्रामराज्य' (Gram Rajya) या मराठी न्यूज पोर्टलला महाराष्ट्रासह देश-विदेशातील वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे ग्रामराज्य न्यूज पोर्टलने केवळ तीन महिन्यात मोठी गरूडझेप घेतली आहे. यामुळे 'ग्रामराज्य'च्या दरमहा वाचकांची संख्या ११ लाखांवर पोहोचली आहे. याशिवाय दर्शकांच्या (व्हिवर्स) दरमहा संख्येने २१ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. हे सर्व वाचक आणि मित्र परिवाराच्या उदंड प्रतिसादामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे 'ग्रामराज्य'च्या वतीने आम्ही आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत आहोत. यापुढेही आम्हाला आपणाकडून असाच प्रतिसाद मिळेल, ही अपेक्षा आहे. 

देशातील पंचायतराज या विषयावरील एकमेव आणि ग्रामीण भागाच्या विकासाशी निगडित विषयावरील 'ग्रामराज्य' हे  एकमेव असे मराठी न्यूज पोर्टल आहे‌. महाराष्ट्रासह देश-विदेशातील वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे ग्रामराज्य  न्यूज पोर्टलने आपली यशस्वी घौडदौड सुरू केली आहे. पंचायतराज हा विषय शहरी भागातील नागरिकांना आवडेल की नाही.शहरी नागरिकांना हा विषय आवडला नाही तर, या संकेतस्थळाचे पुढे काय होणार?, याला ग्रामीण भागातील वाचक मिळेल का? यासह अनेक प्रश्न मनात निर्माण होऊनही, कोणत्याही परिस्थितीत पंचायतराज या विषयावरील 'ग्रामराज्य' हे मराठी भाषेतील बातम्यांचे अनोखे संकेतस्थळ सुरू करायचेचं, असा निश्चय आम्ही हे न्यूज पोर्टल सुरू करताना केला होता. यानुसार ०८ मार्च २०२५ रोजी हे न्यूज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. वाचक आणि दर्शकांच्या (व्हिवर्स) उदंड प्रतिसादामुळे आणखी ऊंच भरारी घेण्याचे बळ 'ग्रामराज्य'ला मिळाले आहे. 

वाचकांनी एवढ्या अल्प कालावधीत 'ग्रामराज्य'वर दाखवलेल्या या प्रेमाबद्दल आम्ही सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार मानत आहोत.  यापुढेही आपण आम्हाला अशीच साथ द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहोत. वाचक या नात्याने आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, या आम्हाला भविष्यात आणखी ऊंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहनात्मक ठरणार आहेत. आपले हे प्रोत्साहन आणि प्रेरणा कायम आमच्या पाठीशी राहील, अशी आशा आहे.

टीप :- अधिक माहितीसाठी www.gramrajya.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी, ही विनंती.