PUWJ Election 2025-26 Result Declared :- पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील तर, सरचिटणीसपदी मंगेश फल्ले यांची निवड
पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी गायकवाड, आव्हाड आणि खजिनदारपदी तायडे विजयी

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २९ जून २०२५ :- पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सन २०२५-२६ च्या वार्षिक निवडणुकीत 'सकाळ'चे बातमीदार ब्रिजमोहन पाटील यांची तर, सरचिटणीसपदी दिव्य मराठीचे बातमीदार मंगेश फल्ले यांची रविवारी (दि.२९ जून) यांची निवड झाली.
दरम्यान, उपाध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सचे बातमीदार राजा गायकवाड आणि साम टी.व्ही.चे ब्युरो चीफ सागर आव्हाड तर, खजिनदारपदी केसरीचे बातमीदार दिलीप तायडे विजयी झाले आहेत. सकाळच्या उपसंपादक तनिष्का डोंगरे व पुण्यनगरीचे बातमीदार निलेश चौधरी यांची याआधीच चिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आहे.
कार्यकारिणीच्या सदस्यपदी लक्ष्मण खोत (भास्कर), राजाराम पवार (सामना), दत्ता आढागळे (सामना), अतुल चिंचली (लोकमत), नरेंद्र साठे (सकाळ),आशिष देशमुख (पुढारी), समीर सय्यद (नवभारत),विक्रांत कुलकर्णी (केसरी), तेजस टवलारकर (महाराष्ट्र टाईम्स) आणि सज्जाद सय्यद (ई टीव्ही मराठी) यांची निवड झाली आहे.
या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. प्रताप परदेशी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. स्वप्नील जोशी यांनी काम पाहिले.