Appointment of Mesco Director :- राज्याच्या माजी सैनिक महामंडळाच्या (मेस्को) संचालकपदी एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांची नियुक्ती

मेस्को हे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्य करणारे महामंडळ 

Appointment of Mesco Director :- राज्याच्या माजी सैनिक महामंडळाच्या (मेस्को) संचालकपदी एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांची नियुक्ती
पुणे:- मेस्कोचे नवनियुक्त संचालक एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप बापट.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २१ जून २०२५ :- महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (मेस्को) संचालकपदी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ही नियुक्ती केली आहे. 

मेस्को ही महाराष्ट्र सरकारची उपक्रम संस्था असून, दि. १८ जानेवारी २००२ रोजी सरकारने या संस्थेची स्थापना केलेली आहे. माजी सैनिकांच्या पुनर्वसन व कल्याणासाठी विविध क्षेत्रांमध्ये त्यांना  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.  एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांच्या नियुक्तीमुळे  मेस्कोच्या (MESCO) दृष्टीकोनात नवचैतन्य निर्माण होईल आणि माजी सैनिकांचे सक्षमीकरण व त्यांचा मुख्य प्रवाहात समावेश करण्यावर अधिक भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त माजी सैनिकांडून व्यक्त करण्यात आली आहे. 

या संस्थेचे संचालक पद हे  राज्य सरकारच्या माजी सैनिकांप्रती असलेल्या कटिबद्धतेचे व त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेतील आणि विकासातील योगदानाचे प्रतिक मानले जाते. एअर मार्शल बापट यांना यापूर्वी दि. २६ जानेवारी २०२० रोजी परम विशिष्ट सेवा पदक व दि .२६ जानेवारी २०१४ रोजी विशिष्ट सेवा पदक राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. तसेच दि. २६ एप्रिल २०२२ रोजी त्यांना मध्यप्रदेश रत्न अलंकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे सर्व सदस्यांनी या नियुक्तीबदल गौरव भावना व्यक्त केली आहे.