वाघोलीत येत्या शनिवारी होणार मराठवाडा भूषण व मराठवाडा मित्र पुरस्कार प्रदान सोहळा!

मराठवाडा मुक्तीदिन समारंभ : मूळ मराठवाड्यातील रहिवासी असलेल्या पुणेकरांना पुण्यात एकत्र येण्याची सुवर्णसंधी 

वाघोलीत येत्या शनिवारी होणार मराठवाडा भूषण व मराठवाडा मित्र पुरस्कार प्रदान सोहळा!
पुणे:- मराठवाडा मुक्ती संग्रामदिन समारंभ.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२५ :- मूळचे मराठवाड्यातील रहिवासी असलेल्या परंतू नोकरी, व्यावसाय, काम-धंद्यानिमित्ताने पुणे शहर व जिल्ह्यात स्थायिक झालेल्या पुणेकरांसाठी येत्या शनिवारी वाघोली येथे मराठवाडा मुक्ती दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात मराठवाडा भूषण आणि मराठवाडा मित्र पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यंदाच्या मराठवाडा भूषण पुरस्काराने बीड जिल्ह्यातील आष्टी -पाटोद्याचे आमदार सुरेश धस यांना गौरविण्यात येणार आहे. 

मराठवाड्याच्या स्वाभिमानी इतिहासाला आणि समाजसेवेच्या अजोड परंपरेला सलाम करणारा एक भव्य-दिव्य सोहळा असणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आयोजन समिती आणि मराठवाडा सेवा संघ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या समारंभाचे आयोजध करण्यात आले आहे. मूळ मराठवाड्यातील, परंतु सध्या पुणे व परिसरात वास्तव्यास असणाऱ्या उत्साही युवकांनी एकजुटीने हा कार्यक्रम आयोजित केला असून तो वाघोली येथील दिनांक सीजन 24K बँक्वेट हॉलमध्ये येत्या शनिवारी (दि.४ ऑक्टोबर) दुपारी १ वाजता होणार आहे. हा सोहळा मराठवाड्याच्या गौरवशाली वारशाला आणि समर्पणाला अभिवादन करणारा एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे. यानिमित्ताने मूळचे मराठवाड्यातील रहिवासी असलेल्या पुणेकरांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. 

दरम्यान, या समारंभात  आमदार सुरेश धस यांच्यासह मराठवाड्याच्या जनतेच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील आणि बावधन परिसरातील समाजसेवेचा ध्वज उंचावणारे बापूसाहेब दगडे पाटील यांना मराठवाडा मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर- साकोरे, आमदार चेतन तुपे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, रवींद्र धांगेकर आणि कामगार आयुक्त बलराज देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन निळकंठ शेळके पाटील, विठ्ठल कदम आणि राहुल नागरगोजे यांनी केले आहे. यासाठीच्या अधिक माहितीसाठी  8380047777 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.