राज्यातील सेवक पतसंस्थेत श्री शिवाजी शिक्षण सेवक पतसंस्था अग्रगण्य 

पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचे गौरवोद्गगार :  २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

राज्यातील सेवक पतसंस्थेत श्री शिवाजी शिक्षण सेवक पतसंस्था अग्रगण्य 
सासवड (ता.पुरंदर) :- सभेला सुरुवात करताना दिपप्रज्वलन करताना संजय जगताप, राजवर्धिनी जगताप, नंदकुमार सागर व संचालक मंडळ.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

सासवड, दि. ४ ऑक्टोबर २०२५ :- सासवड (ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व.चंदूकाका जगताप यांनी या शिक्षण संस्थेच्या पतस्संस्थेला कायम आर्थिक शिस्त लावून दिली. त्यामुळेच ही पतसंस्था आजही चंदूकाका यांचे विचार आणि आर्थिक शिस्तीचे पालन करत कामकाज करत आहे‌. ही पतसंस्था राज्यातील सेवक पतसंस्थांमध्ये आदर्श व अग्रगण्य आहे आणि यापुढेही ती राहील, असे मत पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले. ‌ या शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांतही शिस्त,समाजात नावलौकिक असून चांगले विद्यार्थी घडवावेत,अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

सासवड (ता.पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसरक मंडळ सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ( दि. २८ सप्टेंबर) रोजी झाली. माजी आमदार व शिक्षण संस्थेचे सचिव संजय जगताप यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे आदी  उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक स्व.चंदूकाका जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या सभेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. मानद सचिव हनुमंत पवार यांनी प्रास्ताविक  केले. अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी अहवाल वाचन केले.सरत्या आर्थिक वर्षात संस्थेचे  भागभांडवल ३ कोटी १६ लाख रुपये, ठेवी २ कोटी ११ लाख रुपये , कर्जवाटप ६ कोटी ८ लाख रुपये इतके झाले असून संस्थेला २८ लाख ६२ हजार रुपयांचा नफा झाला असल्याचे सागर यांनी सांगितले. 

या सभेला रविंद्र जगताप, कानिफनाथ आमराळे, उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, सहसचिव मोहन निगडे, संचालक विठ्ठल कदम, प्रिया गायकवाड, पांडुरंग दुर्गाडे, शहाजी जाधव, राजेंद्र जाधव, विद्या कारंडे, जीवन कड, नितीन काकडे, सल्लागार उत्तम निगडे, नंदकुमार बारवकर, विजय काकडे, शिवाजी कोलते, हरीभाऊ टापरे, लक्ष्मण गोळे, शांताराम राणे, मारूती झगडे, गायत्री बेलसरे, विजयकुमार हाके, विलास गंगनमले, व्यवस्थापिका श्रद्धा इभाड आदी उपस्थित होते. संचालक रमेश बोरावके यांनी सुत्रसंचलन केले. रामदास जगताप यांनी आभार मानले.