पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

शिरूर तालुक्यातील न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर रविवारी रात्री कंटेनर व स्वीफ्ट गाडीची समोरासमोर धडक : स्वीफ्टमधील तिघांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी
न्हावरे  ( ता.शिरूर )  :- न्हावरे येथे झालेल्या भीषण अपघात चक्काचूर झालेली स्विफ्ट गाडी

ग्रामराज्य वृत्तसेवा

न्हावरे, ता. शिरूर, दि. २३ मार्च २०२५ :-   न्हावरे (ता.शिरूर ) न्हावरे - तळेगाव ढमढेरे रस्त्यावर सरकेवस्तीजवळ रविवारी  (दि. २३ मार्च ) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कंटनेर व स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या दोन गाड्यांमधील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले आहेत.

या अपघातात न्हावरे येथील कैलास कृष्णाजी गायकवाड ( वय ५० वर्ष),  गौरी कृष्णाजी गायकवाड (वय १८ वर्ष)  आणि गणेश महादेव निर्लेकर (वय ४० वर्ष) यांचा मृत्यू झाला असून दुर्गा कैलास गायकवाड ह्या जखमी झाल्या आहेत.

कैलास गायकवाड हे आपल्या चारचाकी वाहनातून तळेगावहून न्हावऱ्याकडे येत असताना त्यांच्या स्विफ्ट गाडीला कंटनेरने जोरदार धडक दिली. या अपघातात कैलास गायकवाड व त्यांची मुलगी गौरी गायकवाड तसेच जवळचे नातलग गणेश निर्लेकर यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कैलास गायकवाड यांच्या पत्नी दुर्गा कैलास गायकवाड या जखमी झाल्या आहेत.