पालकांनो, पाल्याने अकरावीला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, हे जाणून घ्यायचंय, तर आधी कल तपासा! 

पुण्यातील 'अकॅडमी ऑफ काउंसलिंग ट्रेनिंग अँड टेस्टिंग' या संस्थेत कल चाचणीची सोय

पालकांनो, पाल्याने अकरावीला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, हे जाणून घ्यायचंय, तर आधी कल तपासा! 
पुणे :- विद्यार्थ्यांच्या कल चाचणीचे ए. आय. ने तयार केलेले चित्र.

ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. १९ मे २०२५ :-  दहावी, बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. दहावीच्या निकालानंतर आता लगेचच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, आपल्या पाल्याने कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, याबाबत मात्र पालक गोंधळात पडले आहेत. आपल्या पाल्याला कला, विज्ञान की वाणिज्य, यापैकी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, हेच अद्याप निश्चित होईनासे झालेय ना. पण चिंता करू नका, त्यासाठी फक्त एवढंच करा. ते म्हणाले आपल्या पाल्याला नेमक्या कोणत्या विषयात रस आहे, हे आधी जाणून घ्या. यासाठी तुम्हाला आपल्या पाल्याची कल चाचणी घ्यावी लागेल आणि कल चाचणी घेण्याची सोय पुण्यातील 'अकॅडमी ऑफ काउंसलिंग ट्रेनिंग अँड टेस्टिंग' या संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. 

पालक आणि विद्यार्थी हे दोघेही दहावीनंतर पुढे काय, याबाबत गोंधळलेले आहेत. दहावीनंतर कोणती शाखा निवडायची?, पुढे करिअर म्हणून कोणत्या दिशेने जायचे?,जीवनात यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे?, शाखा निवडताना कोणते विषय सोपे जातील? असे अनेक प्रश्न पालकांना सतावत आहेत. या व अशाच अनेक प्रश्नांमुळे पालकांची चिंता व ताण वाढला आहे. योग्य करिअर निवडीच्या दिशेने जाण्यास दहावीच्या परीक्षेनंतरचा कालावधी  हा एक टर्निंग पॉईंट असतो. याच कालावधीत विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमता, आवडी-निवडी, व्यक्तीमत्वाची गुणवैशिष्ट्ये या बाबींचे जर अचूक मापन झाले तर करिअरच्या अचूक दिशा सापडतात. पाल्यांच्या करिअरची चिंता घालवायची असेल तर, आधी आपल्या पाल्याची कल चाचणी घेणे गरजेचे आहे. 

दहावीनंतर कला, विज्ञान की वाणिज्य, याचा योग्य फैसला करण्यासाठी ही कल चाचणी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे पालकांच्या डोक्यावरील पाल्यांच्या करिअरची चिंता दूर होणार आहे.क्षमतांना आणि व्यक्तिमत्त्वाच्या गुणवैशिष्ट्यांना अनुसरून जर का व्यवसायाचे प्रशिक्षण मिळाले तर, जीवनात यशस्वी होता येते. या सर्व बाबींचा विचार करून, त्यादृष्टीने आपल्या पाल्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. यासाठी अकॅडमी ऑफ काऊन्सेलिंग ट्रेनिंग अँड टेस्टिंग येथे मानसशास्त्रज्ञ ज्ञानेश्वर चाबुकस्वार व त्यांच्या टीमची मदत घेऊ शकता.

अधिक माहितीसाठी 9975500286 किंवा  8087596691 या क्रमांकावर संपर्क साधावा.