पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्या सचिवपदी प्राचार्य भानुदास रिठे  यांची निवड

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडून रिठे यांचा सत्कार 

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्या सचिवपदी प्राचार्य भानुदास रिठे  यांची निवड
पुणे:- पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य भानुदास रिठे यांचा सत्कार करताना वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे व सर्व सहकारी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३० मे २०२५ :- हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथील हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भानुदास रिठे यांची पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्या सचिवपदी प्राचार्य भानुदास रिठे  यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडून रिठे यांचा सत्कार करण्यात आला. रिठे यांचे शिक्षण क्षेत्रात असलेले योगदान आणि शैक्षणिक कार्यातील सक्रिय सहभाग पाहून संघटनेने ही निवड केली आहे.

या सत्कार प्रसंगी बोलताना जालिंदर कामठे म्हणाले, " भानुदास रिठे  यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, कार्यक्षमता व अनुभव हा त्यांच्या या विद्या सचिव पदाच्या कार्यकाळात शिक्षण व्यवस्थेच्या उन्नतीसाठी उपयुक्त ठरेल. त्यांच्या कार्यकाळात सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांची  विद्या सचिव पदासाठी निवड ही योग्य आणि समयोचित आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या परीक्षाविषयक कामकाजाच्या अंमलबजावणीस मोठा हातभार लागेल. मी त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो."

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत पुणे जिल्ह्यातील ७०० माध्यमिक विद्यालयांना विद्या सामितीमार्फत  प्रश्नपत्रिका वाटपाचे कामकाज केले जाते. याचे संपूर्ण नियोजन हे विद्या सामिती मार्फत केले जाते. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय व हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनिअर कॉलेज कोंढवा बुद्रुक येथील प्राचार्य असून ते गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक गरजा, समस्यांवर उपाय आणि शाळांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी मी तत्पर राहीन. ही जबाबदारी मला संधी म्हणून वाटते, असे रिठे यांनी यावेळी बोलताना सांगितले.