खास पुणेकरांसाठी 'कात्रज डेअरी' चे पेशवाई श्रीखंड आणि आम्रखंड बाजारात दाखल, गुढी पाडव्याचा मुहूर्त साधला
पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची सहकारी संस्था असलेल्या कात्रज डेअरीचा अनोखा उपक्रम

कात्रज डेअरीच्या पेशवाई श्रीखंड आणि आम्रखंडने पुणेकरांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे, कारण ते प्रामाणिक चव आणि शुद्धतेसाठी व भेसळविरहीतसाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी, पारंपारिक दृग्धजन्य पदार्थांची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढली असल्याचे अध्यक्ष अॅड. स्वप्नील ढमढेरे यांनी सांगितले.
गुढीपाडव्यादरम्यान वाढत्या मागणीच्या अपेक्षेने, कात्रज डेअरीने उत्पादन वाढवले आहे. गेल्या वर्षी संघाने ११ टन श्रीखंड, १० टन आम्रखंड आणि २.५ टन बासुंदी विकली होती. यावर्षी, सरासरी विक्रीत ३०% वाढ होण्याचा अंदाज असल्याचे ढमढेरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
विशेष गुढीपाडव्यानिमित्त्त किंमत
- अर्धा किलो पेशवाई श्रीखंड ---- १४० रुपये
- अर्धा किलो आम्रखंड --- १४५ रुपये
- बासुंदी ४०० ग्राम ---- १२० रुपये
दरम्यान, सणासुदीच्या काळातील मागणीची पूर्तता करण्यासाठी श्रीखंड व आम्रखंडचा मुबलक पुरवठा सुनिश्केचित केला आहे. डेअरीच्या विक्रीचा लाभ हा शेतकऱ्यांना होत असल्याने ग्राहकांनी कात्रजची दर्जेदार उत्पादने खरेदी करावीत. आम्ही सर्वांना या गुढीपाडव्याला कात्रजच्या शुद्ध, उच्च दर्जाच्या श्रीखंड आणि आम्रखंडाचा आस्वाद घेण्याचे आवाहन ढमढेरे यांनी केले आहे.
रमजान ईद स्पेशल ऑफर
कात्रज डेअरी ही पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची सहकारी संस्था आहे, जी ग्राहकांना उच्च दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे. खडज २२०००:२०१८, खडज १४००१:२०१५ यांसारखे मार्कसारख्या प्रमाणपत्रांसह, कात्रज डेअरी कठोर गुणवत्ता मानकांचे पालन करते, प्रत्येक उत्पादनात शुद्धता आणि उत्कृष्टता सुनिश्चित करते.