Free technical education for needy students :-  बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोफत प्रशिक्षण! 

अर्ज करण्याचे गरजू विद्यार्थ्यांना आवाहन : सीआयई इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स संस्थेतर्फे ‘लक्ष्य’ प्रकल्पाअंतर्गत उपक्रम 

Free technical education for needy students :-  बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोफत प्रशिक्षण! 
पुणे:- व्यावसायिक प्रशिक्षणाचे ए. आय. ने तयार केलेले छायाचित्र.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १८ जून २०२५ :-  आपण बेरोजगार आहात.? आपणास रोजगार हवा आहे.?  पण आर्थिक विवंचनेमुळे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत.?  या प्रश्नांची उत्तरे होय असतील तर, अशा गरजू, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत व्यावसायिक विशेषतः रोजगारक्षम प्रशिक्षण मोफत देण्याची व्यवस्था सीआयई इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स संस्थेने केली आहे. या संस्थेच्यावतीने ‘लक्ष्य’ प्रकल्पा अंतर्गत मोफत रोजगारक्षम प्रशिक्षणाचा उपक्रम राबविल्यात येत आहे.

सीआयई इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स येथे (सीआयआयएस) ‘लक्ष्य’ या प्रकल्पाअंतर्गत सीआयई इंडिया लिमिटेड यांच्यातर्फे गरजू आणि बेरोजगार विद्यार्थी - विद्यार्थींनींसाठी या मोफत प्रशिक्षणाचे आणि नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सीआयई इंडिया ऑटोमोटीव्हचा सीएसआर प्रकल्प ‘लक्ष्य’ हा प्रकल्प प्रमिथ फाऊंडेशन व स्किलसॉनिक्स माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत  आहे. या उपक्रमांतर्गत मोफत टेक्निकल कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यामध्ये सीएनसी ऑपरेटर, इंडस्ट्रिअल वेल्डिंग, मेकॅनिकल फिटर या कोर्सेसचा समावेश आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यी किमान इयत्ता ८ वी पास आणि १८ ते ३५ या वयोगटातील असणे अनिवार्य आहे.शिवाय गरजू विद्यार्थ्यासाठी मोफत वसतिगृह व जेवणाची सुविधा करुन दिली जाणार आहे.

इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी भोसरी येथील सीआयई इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स  सेंटरला भेट द्यावी किंवा 7620791329, 9673987390, 9673987391
 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.