वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे 'ग्रामराज्य'ची उंच भरारी,  ... अवघ्या १० दिवसात ११ हजार वाचक, सर्व  वाचकांचे मनःपूर्वक आभार!

प्रतिदिन सरासरी १० हजार वाचक देतात 'ग्रामराज्य' संकेतस्थळाला भेट : वाचकांची साथ हीच  आमची प्रेरणा 

वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे 'ग्रामराज्य'ची उंच भरारी,  ... अवघ्या १० दिवसात ११ हजार वाचक, सर्व  वाचकांचे मनःपूर्वक आभार!
www.gramrajya.com

ग्रामराज्य वृत्तसेवा, पुणे

पुणे, दि. २३ मार्च २०२५ :-  पंचायतराज हा विषय शहरी भागातील नागरिकांना आवडेल की नाही. शहरी नागरिकांना हा विषय आवडला नाही तर, या संकेतस्थळाचे पुढे काय होणार?, याला ग्रामीण भागातील वाचक मिळेल का? यासह अनेक प्रश्न मनात निर्माण होऊनही, कोणत्याही परिस्थितीत पंचायतराज या विषयावरील 'ग्रामराज्य' हे अनोखे मराठी बातम्यांचे संकेतस्थळ सुरू करायचेचं, असा निश्चय केला. यानुसार दहा दिवसांपूर्वीच या निश्चय  प्रत्यक्षात अमलात आणला आणि एक स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. आमच्या 'ग्रामराज्य' या संकेतस्थळाला अवघ्या १० दिवसात तब्बल ११ हजार वाचक मिळाले आहेत. यामुळे आणखी ऊंच भरारी घेण्याचे बळ 'ग्रामराज्य'ला मिळाले आहे. 

प्रतिदिन सरासरी १० हजार ग्रामराज्य संकेतस्थळाला नियमितपणे भेट देत आहेत. एवढ्या अल्प कालावधीतही आमच्यावर दाखवलेल्या या प्रेमाबद्दल सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार मानून यापुढेही तुम्ही आम्हाला अशीच साथ द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहोत. वाचक या नात्याने आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, याच आम्हाला भविष्यात आणखी ऊंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहनात्मक ठरणार आहेत. आपली हे प्रोत्साहन आणि प्रेरणा कायम आमच्या पाठीशी राहील, अशी आशा आहे.

या वर्षीच्या जागतिक महिला दिनी (दि. ८ मार्च ) ग्रामराज्य हे मराठी बातम्यांचे औपचारिकपणे सुरू झाले. पण प्रत्यक्षात या संकेतस्थळावर बातम्या अपलोड करण्यास १२ मार्चपासून सुरूवात झाली. त्यानंतर १२ ते २२ मार्च या दहा दिवसांच्या कालखंडातच आमचे तब्बल ११ हजार नियमित वाचक झाले आहेत. पुन्हा एकदा सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार आणि यापुढेही अशीच साथ द्याल, ही अपेक्षा.