पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये बारावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करा, यामुळे होणार हा फायदा

पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी  विषय शिक्षक महासंघाची पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये बारावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करा, यामुळे होणार हा फायदा
जिल्हाधिकारी कार्यालय (पुणे) :- पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्याच्या मागणीसाठीचे निवेदन पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र गुडी यांना देताना अधिव्याख्याते

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २६ मार्च २०२५ :-   राज्य सरकारच्या दि. १३ सप्टेंबर २०२४ च्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना इयत्ता १२वी पर्यंत मराठी विषय अनिवार्य करावा. यासाठी या निर्णयाची येत्या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२५-२६) अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. अरविंद मोडक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डूडी यांना सोमवारी (दि.२४) याबाबतचे निवेदन दिले  आहे. यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. निलेश आमले, सचिव प्रा. विजय मराठे, उपाध्यक्ष प्रा. धनराज पाटील, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र रासकर, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. अभिषेक लोखंडे, सहसचिव प्रा. चंद्रकांत भोजने, समन्वयक प्रा. सुनिलराजे निंबाळकर, तज्ज्ञ सल्लागार प्रा.जगदिश पाटील, मार्गदर्शक प्रा. विजय लोंढे, जुन्नर तालुका प्रमुख प्रा.सारिका सोनार, हवेली तालुका प्रमुख ,प्रा. सुभाष खिलारे, भोर वेल्हे तालुका प्रमुख प्रा. स्वाती दुधगावकर , मावळ तालुका अध्यक्ष प्रा. सचिन लांडगे, शिरूर तालुका प्रमुख प्रा. महावीर भिसे, पुणे शहर अध्यक्ष प्रा. अशोक बोबडे, सदस्य प्रा. सचिन गुरव, प्रा. जुबेर पटेल, प्रा. संतोष झांजे, प्रा. पृथ्वीराज जाधव आदी अधिव्याख्याते उपस्थित होते.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांना पाठविण्यात आल्या आहेत.