शालेय विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण, हिवरे (ता. पुरंदर) येथील शाळेचा उपक्रम 

विद्यार्थ्यांसाठी सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती‌ :  भाजपचे नेते जालिंदर कामठे यांचे मत 

शालेय विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण, हिवरे (ता. पुरंदर) येथील शाळेचा उपक्रम 
पुणे:- हिवरे (ता. पुरंदर) येथील शालेय विद्यार्थ्यांबरोबर भाजप नेते जालिंदर कामठे.

प्रा. मीरा बडे-सांगळे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २९ एप्रिल २०२५ :-  वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने पुरंदर येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी  शिवकालीन युद्धकला या विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 

विद्यार्थ्यांसाठी सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती असून प्राचीन युद्ध कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती वाढते. त्याचबरोबर मानसिक मनोबलही वाढत असते. म्हणून येणारी पिढी ही मानसिक व शारीरिकदृष्टीने सुदृढ रहावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी येथे बोलताना व्यक्त केले. भाजप नेते जालिंदर कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली विजया महाडिक यांच्या वतीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या समारंभाला हिवरे गावच्या सरपंच पुनम कामठे, ग्रामपंचायत रमेश कुदळे, शब्बीर भाई शेख, सुदर्शन कुदळे, शंकर कुदळे, नंदू गायकवाड, दीपक गायकवाड, संतोष गायकवाड, मुख्याध्यापिका सुनीता रायडू, प्रशिक्षक शेलार आदी  उपस्थित होते.