येत्या सोमवारी पुण्यात महसूलविषयक कार्यशाळा
निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांची माहिती

ग्रामराज्य न्यूज नेटवर्क
पुणे, दि. ९ मार्च २०२५ :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येत्या सोमवारी (दि. १० मार्च) महसूलविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
पुणे शहरातील कला क्रीडामंच येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
या कार्यशाळेत ई-फेरफार, ई-हक्क, ई-चावडी, ई-पिकपाहणी, ई-क्युजेकोर्ट, ई-कोर्ट, डी-४, शासकीय जागा मागणी, सेवादूत, महाखनिज, महामहसूल, आपले सरकार, पीजी पोर्टल, १०० दिवस कृती आराखडा आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेला मुद्रांक जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी अधीक्षक भूमी अभिलेख, सहायक अधीक्षक भूमी अभिलेख तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी,सेतू चालक व
संबंधित कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.