वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!
संस्थाचालक जालिंदर कामठे यांनी गुलाबपुष्प देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १७ जून २०२५ :- कोंढवा बुद्रुक (ता. हवेली) येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या सर्व शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व संस्थाचालक जालिंदर कामठे यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
नवीन शैक्षणिक वर्ष (2025 -26 ) सोमवारपासून (दि. १६ जून) सुरू झाले.या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी संस्था चालक जालिंदर कामठे यांनी संस्थेच्या पुरंदर तालुक्यातील हिवरे येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय आणि हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथील प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय व हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनिअर कॉलेज व प्रतिभाताई पवार प्राथमिक विद्यामंदिर येथील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
यावेळी जालिंदर कामठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके व खाऊ वाटप करून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन भविष्यामध्ये यशाची उत्तुंग शिखरे गाठावीत व आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशी भावना कामठे यांनी हिवरे येथील शाळेत बोलताना व्यक्त केली. यावेळी सरपंच पुनम कामठे, उपसरपंच रामदास कुदळे, राजेंद्र जाधव, शब्बीर शेख, सागर कुदळे, नंदू गायकवाड, सुदर्शन कुदळे, रमेश गायकवाड, संतोष दळवी, सचिन लिंभोरे, मुख्याध्यापिका सुनीता रायडू व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिभाताई पवार शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
कोंढवा बुद्रुक येथील प्रतिभाताई पवार शाळेत प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची रंगतदार सुरुवात करण्यात झाली. संस्थेचे अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालींदर कामठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन आणि टाळ-वादन व फुग्यांच्या सजावटीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून शैक्षणिक वर्षाच्या यशस्वी वाटचालीसाठी हा दिवस प्रेरणादायी ठरणार आहे, असे मत जालिंदर कामठे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके, शालेय साहित्याचे वाटप जालींदर कामठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य भानुदास रिठे, पर्यवेक्षक हेमंत जाधव, शंकर बांगर ज्ञानदेव गायकवाड आदींसह विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.