पुणे झेडपीचे 'सीईओ' गजानन पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

कार्यालयीन मूल्यमापना'त राज्यात तृतीय आल्यामुळे 'सीईंओं'च्या पाठीवर मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप

पुणे झेडपीचे 'सीईओ' गजानन पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
मुंबई:- उत्कृष्ट कार्यालयीन मूल्यमापना'मुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळालेल्या प्रशस्तीपत्रकासमवेत पुणे झेडपीचे सीईओ गजानन पाटील, अतिरिक्त सीईओ चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात आदी

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ७ मे २०२५ :-  महाराष्ट्र सरकार आणि भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘कार्यालयीन मूल्यमापन - १०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत राज्यात तृतीय क्रमांक पटकावलेले पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गजानन पाटील यांचा बुधवारी (दि. ७ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या गौरवाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सीईओ पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत, त्यांना शुभेच्छा दिल्या. 

मुंबईत आयोजित करण्यात आला आलेल्या या कौतुक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार,  सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते. 

या मोहिमेअंतर्गत कार्यालयीन कार्यपद्धती, कार्यक्षमता, पारदर्शकता, नागरिकांशी संवाद, वेळेत सेवा देणे अशा विविध घटकांवर मूल्यांकन करण्यात आले होते.