पुणे जिल्हा बँकेला जागतिक स्तरावरील गुणवत्ता व्यवस्थापन व उत्कृष्ट कार्यप्रणालीचे 'आयएसओ मानांकन'!
जिल्हा बँकेच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा : बँकेला आता आंतरराष्ट्रीय प्रमाणकाशी जुळण्याचा फायदा होणार

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ८ एप्रिल २०२५ :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (पीडीसीसी) मंगळवारी (दि. ८ एप्रिल) जागतिक स्तरावरील गुणवत्ता व्यवस्थापन उत्कृष्ट कार्यप्रणालीबाबतचे १५० ९००१:२०१५ हे 9001:2015 मानांकन मिळाले आहे. यामुळे पुणे जिल्हा बॅंकेच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या मानांकनामुळे जिल्हा बँकेला आता आंतरराष्ट्रीय प्रमाणकाशी जुळण्याचा फायदा होणार आहे.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रेय भरणे, बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष रमेश थोरात, अध्यक्ष प्रा. डॉ.दिगंबर दुगडि, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक सर्वश्री रेवणनाथ दारवटकर, भालचंद्र जगताप, रणजित तावरे, प्रविण शिंदे, दत्तात्रय येळे, संभाजी होळकर, निर्मला जागडे, पुजा बुट्टे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई, सरव्यवस्थापक संजय शितोळे, बी.एस.आय. ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीचे भारतातील विक्री विपणन विभागाचे संचालक महेश मालपाठक, व्यावसाय विकास अधिकारी रत्नदिप कोटुळे आदी उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, क्रीडामंत्री. दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने नेत्रदिपक अशी कामगिरी केलेली आहे. बदलत्या काळामध्ये वित्तीय प्रणाली, नविन तंत्रज्ञान व ग्राहकांच्या अपेक्षा या बाबीनुसार बँकींग व सहकार क्षेत्रात अमुलाग्र असे बदल घडून आलेले आहेत. तसेच या क्षेत्रांमध्ये प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट व तत्पर सेवा देण्याच्या उद्देशाने व नवीन बदलांना व स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी अनुरूप अशी कार्यपद्धती व यंत्रणा राबविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. गतिमान प्रशासन देण्यासाठी जिल्हा बँक कार्यरत आहे. २१ व्या शतकातील समृध्द सुदृढ, सक्षम व अग्रगण्य संस्था म्हणून आपले स्थान कायम राखण्यासाठी जिल्हा बँक सातत्याने प्रयत्नशील आहे. सहकार क्षेत्र हे आर्थिक सेवेचे साधन असून समाजातील तळागाळातील लोकांना आर्थिकदृष्ट्या अधिक समृध्द व सशक्त करण्याचे एकमेव साधन असल्याने जिल्हा बँक अल्प, अत्यल्प भुधारक घटकांना, बचत गटातील महिलांना विचारात घेऊन त्यांची सर्वागिण उन्नती करण्यासाठी कटिबध्द जाहे. ग्राहकांच्या प्रती असणाऱ्या अपेक्षांची पुर्तता करण्यास बँकेचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग कटिबध्द आहे. तसेच ग्राहकांचा विश्वास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून मानली जाणारी पुणे जिल्हा बँक ही गुणवत्ता प्रणालीच्या सहाय्याने यशस्वी बाटचाल करत असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
जिल्हा बँकेला याआधी सन २०१२ मध्ये आय. एस. ओ. ९००१:२००८, सन २०१९ मध्ये १५० ९००१:२०१५ हे मानांकन मिळालेले आहे.