Agriculture minister dattatray bharne sansar visit : राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील पुरग्रस्त भागातील ग्रामस्थांशी साधला संवाद 

सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी : येथील ओढ्याचे खोलीकरण करण्याचा आदेश 

Agriculture minister dattatray bharne sansar visit : राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील पुरग्रस्त भागातील ग्रामस्थांशी साधला संवाद 
पुणे:- इंदापूर तालुक्यातील पुरग्रस्त भागातील ग्रामस्थांशी संवाद साधताना कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे.

ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. १५ सप्टेंबर २०२५ :- राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी अतिवृष्टी व पुरामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सणसर गावाला भेट दिली आणि तेथील नुकसानीची पाहणी केली‌. यावेळी त्यांनी शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत पुरग्रस्त भागातील ग्रामस्थांना धीर दिला आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे करुन बाधितांना तातडीची मदत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. 

दरम्यान, अतिवृष्टीमुळे सणसर येथे मोठे नुकसान झाले आहे. कारण सणसर येथील ओढ्याला पूर येऊन लोकवस्तीत पाणी शिरले आणि या पुराच्या पाण्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर दत्तात्रेय भरणे यांनी सणसर येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 
मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील ग्रामस्थांना आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचा आणि सणसर येथील ओढ्याचे खोलीकरण करण्याचा आदेश दिला. 

दरम्यान, यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी भरणे यांना नुकसानीची माहिती दिली. शिवाय या पूरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असल्याचे नावडकर यांनी भरणे यांना यावेळी सांगितले. सणसर येथील ओढ्याचे खोलीकरण करण्याची येथील ग्रामस्थांच मागणी विचारात घेता, त्यांना होणारा त्रास कमी करण्याकरिता प्रशासनाने लवकरात लवकरात ओढ्याचे खोलीकरण काम करावे, अशी सूचना भरणे यांनी केली. 

यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, संबंधित विभागाचे अधिकारी,  स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.