बीडच्या प्रियदर्शनी मुंडेचा पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खास सन्मान 

रोख २५ हजार रुपयांच्या पारितोषिकाने गौरव : दहावीत ९८.८० टक्के गुण 

बीडच्या प्रियदर्शनी मुंडेचा पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खास सन्मान 
पुणे:- दहावीच्या परीक्षेत तब्बल ९८.८० टक्के गुण मिळविलेल्या प्रियदर्शनी मुंडे हिचा खास सन्मान करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २१ जुलै २०२५ : मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील खेडेगावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रियदर्शनी महादेव मुंडे हिने पुणे शहरातील एका नामवंत शाळेत दहावीच्या परीक्षेत गुणवत्तेचा डंका वाजवला आहे.प्रियदर्शनी मुंडे हिने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत तब्बल ९८.८० टक्के गुण मिळविले आहेत. तिच्या या गुणवत्तेची उपमुख्यमंत्री आणि बीड व पुणे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री अजित पवार यांनी दखल घेत, तिचा पवार यांनी रोख २५ हजार रुपयांच्या पारितोषिकासह पुण्यात खास सन्मान केला आहे. 

प्रियदर्शनी मुंडे ही पुणे येथील पी. आय.सी.टी.या माध्यमिक शाळेत शिक्षण घेत होती.तिने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तब्बल ९८.८० टक्के गुण मिळविले आहेत.प्रियदर्शनी ही मुळची बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना (ता. बीड) येथील रहिवासी आहे. ताडसोन्ना हे ग्रामीण भागातील एक खेडेगाव आहे. अशा खेड्यातून येऊन पुण्यात गुणवत्तेत मोठी चमकदार कामगिरी केल्याबद्दल अजित पवार यांनी प्रियदर्शनी मुंडे हिचे तोंडभरून कौतुक केले आहे. 

बाणेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या खास सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावेळी बाणेर भागातील माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे, राष्ट्रवादीचे नेते राहुल  बालवडकर आदी उपस्थित होते.