State level awards of The Buddhist Development Foundation announced : प्रसिद्ध कवी साजन बेंद्रे यांना नॅशनल बुद्धिस्ट तर, प्रा. सुकुमार कांबळे यांना बुद्धभूषण पुरस्कार जाहीर!

दि बुद्दिष्ट विकास फाऊंडेशनच्या विविध पुरस्कारांची घोषणा : डॉ. गजेंद्र बडे यांना ' संविधान सन्मान' पुरस्काराने गौरविणार 

State level awards of The Buddhist Development Foundation announced : प्रसिद्ध कवी साजन बेंद्रे यांना नॅशनल बुद्धिस्ट तर, प्रा. सुकुमार कांबळे यांना बुद्धभूषण पुरस्कार जाहीर!
पुणे:- दि बुद्धिष्ट विकास फाऊंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २३ नोव्हेंबर २०२५ :- प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांना नॅशनल बुद्धिस्ट अॅवार्ड,  प्रा. सुकुमार कांबळे यांना बुद्धभूषण, संकल्प गोळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव तर, कांचन वाघमारे यांना माता रमाई भीमराव आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय डॉ. गजेंद्र बडे यांना 'संविधान सन्मान' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. भारतीय संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खास समारंभात येत्या ३० नोव्हेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. 

महाराष्ट्रातील दि बुद्धिष्ट विकास फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष शिवाजीराव झोडगे यांनी केली. दि बुद्धिष्ट विकास फाउंडेशन आणि बांधकाम कामगार श्रमिक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड येथे गौरव संविधानाचा या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही झोडगे यांनी यावेळी सांगितले.

गौरव संविधानाचा हा समारंभ पिंपरी चिंचवड येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे येत्या रविवारी (दि. ३० नोव्हेंबर) रोजी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे हे या समारंभाचे अध्यक्ष असणार आहेत. या समारंभाला माजी आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर,  केंद्रीय खेल व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या नेहरु युवा केंद्राचे निवृत्त उपसंचालक यशवंत मानखेडकर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती -जमाती आयोगाच्या सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्ह्याचे  सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान, याच समारंभात धीरज वानखेडे यांना संविधान रत्न, दिनेश कुऱ्हाडे यांना उद्योग रत्न, अमित तायडे यांना संविधान गौरव तर, डॉ. गजेंद्र बडे, प्रशिक भालेराव, विनोद चांदमारे, कलिंदर शेख, अॅड. तात्यासाहेब घुमरे पाटील, अर्जून मुंडे, एम‌.सी. ब्लॅक, विजय भुजबळ, रमेश ब्रम्हा आणि देवराम सरोक्त आदींना विविध क्षेत्रात संविधान संवर्धन व जागृतीबाबत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय संविधान सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.