Pune Municipal Corporation ward-wise reservation Declared : हक्काचे मतदारसंघ राखीव झाल्याने अनेक 'दिग्गजां'चा पालिका सभागृहात पुन्हा परतण्याचा मार्ग बंद!
पुणे महापालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर : रवींद्र धंगेकर, आबा बागुल, प्रविण चोरबोले यांचे मतदारसंघ राखीव
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ११ नोव्हेंबर २०२५ :- पुणे महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीत महानगरपालिकेच्या मावळत्या सभागृहातील म्हणजेच सन २०१७-२०२२ या कार्यकाळातील अनेक दिग्गज नगरसेवकांचे हक्काचे मतदारसंघ (वॉर्ड) विविध प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. यामुळे हे दिग्गज नगरसेवक पुणे महापालिकेच्या आगामी पाच वर्ष कालावधीच्या सभागृहात पुन्हा परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी काही माजी नगरसेवकांना आपापल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींना संधी मिळू शकणार आहे. मतदारसंघ राखीव झालेल्यांमध्ये माजी नगरसेवक व माजी आमदार रविंद्र धंगेकर, माजी नगरसेवक आबा बागुल, प्रविण चोरबेले आदींचा समावेश आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी (दि. ११ नोव्हेंबर) जाहीर करण्यात आली.महापालिकेची निवडणूक ही प्रभाग पद्धतीने होणार आहे. यानुसार प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असणार आहेत. या सर्व प्रभागांमधून प्रवर्गनिहाय राखीव जागा या आरक्षण सोडतीत निश्चित करण्यात आल्या आहेत.यामुळे सुनीता वाडेकर,सरस्वती शेंडगे,अविनाश बागवे,आबा बागुल, श्रीनाथ भीमाले, प्रवीण चोरबेले, मनिषा लडकत आदींचे मतदारसंघ (वॉर्ड) हे राखीव झाले आहेत. मात्र यापैकी काही वॉर्ड हे खुले झाल्याने यापैकी काही जण खुल्या गटातून पुन्हा निवडणूक लढवू शकणार आहेत.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या मावळत्या सभागृहातील दोन्ही माजी माजी महापौर पुन्हा सभागृहात नसणार आहेत. कारण या दोन्ही माजी महापौरांपैकी मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. दुसरे माजी महापौर मुरलीधर मोहोळ लोकसभेवर निवडून गेले असून सध्या ते केंद्रीय सहकार राज्यमंत्री आहेत.
याशिवाय सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चेतन तुपे, हेमंत रासने हे माजी नगरसेवक विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे हे सर्व जण पुन्हा महापालिकेच्या सभागृहात परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक ३८ मध्ये दोन जागांसाठी माजी महापौर दत्ता धनकवडे, वसंत मोरे, प्रकाश कदम, युवराज बेलदरे हे माजी नगरसेवक एकमेकांसमोर तर स्मिता कोंढरे, राणी भोसले, मनिषा कदम, कल्पना थोरवे या तीन जागांसाठी एकमेकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी नगरसेवकांच्या एकूण १६५ जागा आहेत. निवडणुकीसाठी एकूण ४१ प्रभाग असणार आहेत. एकूण प्रभागांपैकी ४० प्रभागात प्रत्येकी चार तर, एका प्रभागात पाच नगरसेवक असणार आहेत.
पुणे महापालिका प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक १ :- कळस- धानोरी-लोहगाव उर्वरित
अ)अनुसूचित जाती महिला
ब ) अनुसूचित जमाती
क) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २ :- फुलेनगर- नागपूर चाळ
अ) अनुसूचित जाती महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३ :- विमाननगर- लोहगाव
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४ :- खराडी- वाघोली
अ) अनुसूचित जाती
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५ :- कल्याणीनगर- वडगावशेरी
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६ :- येरवडा- गांधीनगर
अ) अनुसूचित जाती
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७ :- गोखलेनगर- वाकडेवाडी
अ) अनुसूचित जाती महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८ :- औंध - बोपोडी
अ) अनुसूचित जाती
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९ :- सूस-बाणेर-पाषाण
अ) अनुसूचित जमाती महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १० :- बावधन- भुसारी कॉलनी
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११ :- रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२ :- शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी
अ) अनुसूचित जाती महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क)सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १३ :- पुणे स्टेशन- जयजवान नगर
अ) अनुसूचित जाती
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १४ :- कोरेगाव पार्क -घोरपडी -मुंढवा
अ) अनुसूचित जाती महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क)सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १५ :- मांजरी बुद्रुक-केशवनगर
अ)अनुसूचित जाती महिला
ब)नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १६ :- हडपसर- सातववाडी
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १७ :- रामटेकडी- माळवाडी-वैदूवाडी
अ)अनुसूचित जाती
ब)नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १८:- वानवडी- साळुंखे विहार
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १९ :- कोंढवा खुर्द- कौसरबाग
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २० :- शंकर महाराज मठ-बिबवेवाडी
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २१ :- मुकुंदनगर- सॅलिसबरी पार्क
अ)अनुसूचित जाती
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २२ :- कासेवाडी डायस प्लाॅट
अ) अनुसूचित जाती महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २३ :- रविवार पेठ- नाना पेठ
अ) अनुसूचित जाती
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २४ :- कसबा गणपती- कमला नेहरू रुग्णालय- केइएम रुग्णालय
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २५ :- शनिवार पेठ- महात्मा फुले मंडई
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क) सर्वसाधारण महिला
ड)सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २६ :- घोरपडे पेठ- गुरूवार पेठ- समताभूमी
अ) अनुसूचित जाती
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २७ :- नवी पेठ- पर्वती
अ) अनुसूचित जाती
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २८ :- जनता वसाहत- हिंगणे खुर्द
अ) अनुसूचित जाती महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २९ :- डेक्कन जिमखाना- हॅपी काॅलनी
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३० :- कर्वेनगर- हिंगणे होम कॉलनी
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३१ :- मयूर काॅलनी - कोथरूड
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३२ :- वारजे- पाॅप्युलरनगर
अ) अनुसूचित जाती महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३३:- शिवणे- खडकवासला
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३४ :- नऱ्हे -वडगाव बुद्रूक- धायरी
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३५ :- सनसिटी- माणिकबाग
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३६ :- सहकारनगर- पद्मावती
अ) अनुसूचित जाती
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३७ :- धनकवडी- कात्रज डेअरी
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३८ :- बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण महिला
इ) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३९:- अप्पर व सुपर इंदिरानगर
अ) अनुसूचित जाती महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४० :- कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी
अ) अनुसूचित जाती
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४१ :- महंमदवाडी- उंड्री
अ) अनुसूचित जाती महिला
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
