Wablewadi ZP School 'beats' the state in the scholarship exam-2025 :- शिष्यवृत्ती परीक्षेत वाबळेवाडी झेडपी शाळेचा राज्यात 'डंका'

आठवीची अनुष्का वाबळे राज्यात दुसरी : आठवीचे तब्बल १६ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले 

Wablewadi ZP School 'beats' the state in the scholarship exam-2025 :- शिष्यवृत्ती परीक्षेत वाबळेवाडी झेडपी शाळेचा राज्यात 'डंका'
पुणे:- इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरी आलेली अनुष्का वाबळे व पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चमकलेले विद्यार्थी मुख्याध्यापक व शिक्षकांसमवेत

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १५ जुलै २०२५ :- पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा एकदा राज्यात डंका वाजवला आहे. या शाळेतील इयत्ता पाचवी आणि आठवीचे मिळून एकूण तब्बल ६३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. याशिवाय इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतील विद्यार्थिनी अनुष्का वाबळे हीने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.इयत्ता आठवीचे तब्बल १६ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी २०२५ मध्ये ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला या शाळेतील एकूण ८५ विद्यार्थी बसले होते. यापैकी ८२ विद्यार्थी हे पात्र ठरले आहेत . पाचवीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा या शाळेचा निकाल ९६.४७ टक्के इतका लागला आहे. पाचवीचे एकूण ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून यापैकी ४ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

दरम्यान, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला (इयत्ता ८वी)  ४९ विद्यार्थी बसले होते.यापैकी ४४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के इतका लागला आहे.आठवीचे ३१ विद्यार्थी हे गुणवत्ता यादीमध्ये आले असून, यापैकी  १६ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत.आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या अनुष्का वाबळे हिला ३०० पैकी २८६ गुण मिळाले आहेत. ती ग्रामीण विभागातून ती राज्यात दुसरी आली आहे. इयत्ता आठवीच्या राज्य गुणवत्ता यादीत गतवर्षीसुद्धा याच शाळेने वर्चस्व राखले होते. यावर्षी शाळेने राज्यात प्रथम स्थान पटकावले असल्याचे या शाळेचे मुख्याध्यापक विजय गोडसे यांनी सांगितले. 

इयत्ता पाचवीचे  राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी

 (कंसात मिळालेले गुण व राज्य गुणवत्ता यादीतील क्रमांक)

पियुष धुमाळ (२८८- ४था), श्रृती कड (२८६- ५वी, वेदांगी गवारे (२८४- ६वी),अर्णव मुळे (२८४-६ वा). 

जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी 

निषाद जोशी, कौस्तुभ निकम, सायली रामाणे, ओजस्वी पलांडे, सानवी गडदणे, आराध्या शेळके, देवेश हुरसाळे, रुद्र नैराळे, निनाद आरगडे, काव्या बालवडे, शिवम दिघे,कृष्णा तावरे,वरूण बिराजदार, स्वरा बोऱ्हाडे, आराध्या विरोळे,साईराज लवटे,अनुष्का डफळ, दुर्वा जगदाळे, स्वरा साकोरे, सर्वेश गुंजाळ, हर्षवर्धन नरके, समर्थ वाघे, अथर्व  राऊत, स्वरा राऊत, आराध्या रुके, प्रणव झावरे, स्नेहल पोवार, स्वरा थोरात.

 इयत्ता आठवी चे राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी

(कंसात गुण व राज्य गुणवत्ता यादीतील क्रमांक)

अनुष्का वाबळे (२८६-२ री), संस्कार गिते (२८२- ४था), संस्कृती विरोळे (२८२-४थी), आर्यन भुजबळ (२७८-७वा), रेवती पिल्ले (२७६- ९वी), श्रावणी थोरात (२७६-९वी), उत्कर्षा खळदकर (२७६-९वी), दिया थिटे (२७४-११वी),शार्दुल गवारी(२७४-११वा), तन्मय शिंदे (२७४-११वा), आर्या शिवले (२७२-१३वी), प्रतिक्षा म्हेत्रे (२७२-१३वी), सिद्धार्थ भोसले (२७२-१३वा), सिद्धार्थ दगडे (२७२-१३वा), अथर्व गायकवाड (२७०-१४वा),सोहम वाबळे (२६८-१६वा), चैताली शेलार (२६८-१६वी).

जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी

ईशा कुकडे, यशराज काळे, नम्रता अरगडे, वरदराजे काळे, स्वराज शिवले, साईराज काळे, तनया चव्हाण, श्रद्धा बाविस्कर, समीक्षा पडवळ, शिवम बारगळ, सुमन चौहान, हर्षदा आवटे, वाहिद मुलाणी, संवेद शिवले, तन्मय विरोळे.

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना गितांजली वाघोले व किरण अरगडे यांनी तर, इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिभा काळे व गोरक काळे यांनी मार्गदर्शन केले.केंद्रप्रमुख प्रकाश लंघे,विस्तार अधिकारी वंदना शिंदे आणि मुकुंद देंडगे, गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप वाबळे,शिक्रापूर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे,त्रिनयन कळमकर आणि सरपंच रमेश गडदे यांनी यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले आहे.