Keralam Renaming: “केरल”चे “केरलम”मध्ये रूपांतर; केंद्राचा ऐतिहासिक निर्णय, सांस्कृतिक ओळखीला नवे बळ.

केरल”चे अधिकृत नाव आता “केरलम”; केंद्राचा ऐतिहासिक निर्णय, सर्व सरकारी कागदपत्रांत लवकरच नवे नाव दिसणार.

Keralam Renaming: “केरल”चे “केरलम”मध्ये रूपांतर; केंद्राचा ऐतिहासिक निर्णय, सांस्कृतिक ओळखीला नवे बळ.
“Renaming ‘Kerala’ to ‘Keralam’.”

केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळाने केरळ राज्याचे अधिकृत नाव “केरलम” करण्याच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. आता संबंधित विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर सर्व सरकारी कागदपत्रे, नकाशे, परीक्षा फॉर्म आणि प्रशासकीय नोंदींमध्ये “केरलम” हे नाव दिसणार आहे.​ मलयाळम भाषेतील उच्चाराशी जुळणारे हे नाव खरेतर राज्याच्या स्थापनेपासूनच लोकाभिमुख वापरात होते.​भाषाप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी काही विरोधकांनी नावबदलापेक्षा रोजगार व महागाई अशा मुद्द्यांना प्राधान्य द्यावे, अशी टीका केली आहे.​ राज्य सरकार मात्र हा बदल सांस्कृतिक स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचा दावा करत आहे.