वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १ ऑगस्ट २०२५ :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त तर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी ((दि.१ ऑगस्ट) विनम्र अभिवादन करण्यात आले. भाजपचे नेते आणि या प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते या दोन्ही लोक नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना कामठे म्हणाले, "भारतीय स्वातंत्र्याच्या आधुनिक भारताचा निर्माता म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ओळखले जातात.त्यांची स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा आणि स्वराज्याच्या दृढ भूमिकेची भावना पुन्हा एकदा समाजात जागृत झाली आहे. त्यांचे स्वदेशी तत्वज्ञान, सामाजिक बांधिलकी व स्वराज्याची भूमिका महत्वपूर्ण आहे. तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी शोषित, दलित आणि कष्टकरी लोकांसाठी मोठे योगदान आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा पुन्हा एकदा समाजात जागृत होणे आवश्यक आहे. आदिवासी–दलित वर्गासाठी त्यांनी लिहिलेले साहित्य हे आजही प्रेरणा ठरत आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मुंबईतील गिरणी कामगार वर्गासाठी त्यांनी आपली लेखनशक्ती व काव्यकौशल्य वापरली .वंचित वर्गाचे आवाज साहित्य आणि संगीताच्या माध्यमातून पोहोचवले. फकिरा,चित्रा, वैजयंता अशा अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.ज्यामध्ये सामाजिक न्याय, श्रमिक समस्या आणि जाती–धर्मातले भेद यांचा उलगडा मांडला आहे."
यावेळी शिवाजी मरळ, प्राचार्य भानुदास रिठे, मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, संभाजी साबळे सुधीर कबाडी,शिरीष चाचर, सुधाकर शिळीमकर, कविता काळे,वैशाली सोमवंशी, प्रतिमा केदार,आरती खलाटे आदी उपस्थित होते. प्राचार्य रिठे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संभाजी साबळे यांनी केले. शिरीष चाचर यांनी आभार मानले.
